Nandubar News : न्याय्य मागण्या मान्य न केल्यास बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे यांच्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
Officers of the Association while giving a statement to the Resident Sub-District Officer.
Officers of the Association while giving a statement to the Resident Sub-District Officer.esakal

Nandubar News : कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार जिल्हा संघटनेतर्फे यांच्या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्याने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जात नसल्याने व त्याबाबत वारंवार आश्वासन देऊनही आपण चर्चा करीत नसल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाने पूर्वी दिलेल्या इशारापत्रानुसार या वर्षीच्या बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (Boycott of examination of 12th answer sheet if justified demands are not accepted nandurbar news)

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. कनिष्ठ महाविद्यालयील शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा करून आपण गेल्या वर्षी मार्च २०२३ मध्ये काही मागण्या मान्य करीत लेखी आश्वासन दिल्यानंतर महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला होता.

त्यानंतर मागण्यांमधील एक हजार २९८ वाढीव पदांना मान्यता देण्याऐवजी संबंधित पदांवर कार्यरत केवळ २८३ शिक्षकांच्या समावेशनाचा आदेश काढला व राज्यात काही शिक्षकांचे समायोजन करण्यात आले परंतु अनेक शिक्षकांचे समावेशनातून झालेले नाही.

अनेक शिक्षकांबाबत त्रुटीची पूर्तता होऊनही त्यांचे समावेशनाचे आदेश दिलेले नाहीत, तसेच यांपैकी काही शिक्षकाचे वेतन अद्याप सुरू झालेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

शिक्षकांना वेतनश्रेणी सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना शाळा संहितेनुसार वर्गातील विद्यार्थिसंख्येचे निकष पाळणे इत्यादी मान्य मागण्यांचे आदेश निघालेले आहेत.

Officers of the Association while giving a statement to the Resident Sub-District Officer.
Nandurbar News : नंदुरबारात आजपासून नाट्याविष्कार

उर्वरित मागण्यांबाबत उन्हाळी अधिवेशन चर्चा केली जाईल, असे सांगितले होते. अद्यापही आपण चर्चा केलेली नाही. नागपूर अधिवेशनात महासंघाने धरणे आंदोलन केल्यानंतर निवेदन स्वीकारताना आपण अधिवेशन संपल्यानंतर लगेचच बैठक घेऊ.

असे आश्वासन दिले; परंतु त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे नाइलाजाने पूर्वसूचनेनुसार महासंघ बहिष्कार आंदोलन करीत आहे.

निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, जिल्हा सचिव प्रा. गणेश सोनवणे, उपाध्यक्ष प्रा. आसिफ शहा, जिल्हा सहसचिव प्रा. भरत चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख प्रा. सुनीता कुवर.

शहादा तालुकाध्यक्ष विजय डोळे, आयटी विषयाचे सचिव विकास पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. वाय. जी. पाटील, प्रा. संजोक्ता गिरासे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.

Officers of the Association while giving a statement to the Resident Sub-District Officer.
Nandurbar News : ‘आदिवासी विकास’तर्फे जिल्ह्यात 27 हजार घरकुले : डॉ. विजयकुमार गावित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com