Nandurbar News : ‘आदिवासी विकास’तर्फे जिल्ह्यात 27 हजार घरकुले : डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात ९७ हजार घरकुले देण्याचा मानस असून, त्यातील २७ हजार ५०० घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली.
While laying the foundation stone of various development works in Dhadgaon taluk, Minister Dr. Vijayakumar Gavit and office bearers.
While laying the foundation stone of various development works in Dhadgaon taluk, Minister Dr. Vijayakumar Gavit and office bearers.esakal

Nandurbar News : आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात ९७ हजार घरकुले देण्याचा मानस असून, त्यातील २७ हजार ५०० घरकुले एकट्या नंदुरबार जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून, जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती घरकुलापासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले.

धडगाव तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. (Dr Vijayakumar gavit statement 27 thousand households in district by Tribal Development nandurbar news)

कार्यक्रमास सुभाष पावरा, रूपसिंग तडवी, रामा वळवी, हिरालाल पाडवी, रमेश तडवी, मंगेश तडवी, राजेंद्र तडवी, किशोर तडवी, शिवाजी पराडके, लतीश मोरे, चंदू वळवी व पंचक्रोशीतील अधिकारी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले, की जिल्ह्यातील ६५ हजार घरांमध्ये वीज पोचावी यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील ५५ हजार घरकुलांना वीज दिली जाणार आहे.

जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येकाला पाणी दिले जाणार आहे. पाण्याची गुणवत्ता तपासून आवश्यक तेथे फिल्टरही बसविले जाणार आहे. जलजीवन मिशनसाठी वीजबिलाचा प्रश्न उद्‌भवणार नाही.

While laying the foundation stone of various development works in Dhadgaon taluk, Minister Dr. Vijayakumar Gavit and office bearers.
Nandurbar News : ओरपा येथील उदय नदीवरील पूल अखेर मंजूर; डॉ. गावितांच्या हस्ते भूमिपूजन

यासाठी सोलर प्लांटचीही तरतूद आराखड्यांमध्ये करण्यात आली आहे. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश कुटुंबांचे आजोबा-पणजोबांच्या नावावर रेशनकार्ड असून.

त्यामुळे एखाद्या योजनेचा लाभ त्या कुटुंबातील आजोबा-पणजोबाने घेतला असल्यास त्या कुटुंबातील कुणालाही त्या योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यासाठी प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे रेशनकार्ड स्वतंत्र बनवून घेणे गरजेचे आहे.

ते म्हणाले, की दवाखाना, शाळा, आश्रमशाळा, ग्रामपंचायत, तालुक्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या रस्त्यांची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाने आदिवासी दुर्गम भागासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना आणली असून.

येणाऱ्या काही दिवसांत या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे दुर्गम भागात आपल्याला पाहावयास मिळणार आहे.

While laying the foundation stone of various development works in Dhadgaon taluk, Minister Dr. Vijayakumar Gavit and office bearers.
Nandurbar News : महिलेची तापी पुलावरून उडी; जीव वाचविणाऱ्यांचा सन्मान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com