खिडकीला कापडाची दोरी बांधली...अन्...अगदी सिनेस्टाईल!

अमोल खरे
रविवार, 22 डिसेंबर 2019

किरकोळ कारणावरून रागाच्या भरात घरातून लहान मुले पळून जात असल्याच्या घटना मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली अशा मुलासाठी शहरातील कॅम्प भागात बालगृह निर्माण करण्यात आला आहे. रेल्वेने पळून आलेल्या अल्पवयीन मुला-मुलीना आरपीएफ, रेल्वे पोलीस या बालगृहात नेऊन सोडल्यानंतर बाल गृहातील अधिकारी, कर्मचारी या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना त्यां हवाली करतात.

नाशिक : अगदी सिनेमाच्या कथानकाला शोभावी अशी घटना मनमाड शहरातील बालसुधारगृहात घडली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी मध्यरात्री इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीला कापडाची दोरी बांधून तिच्या आधारे खाली उतरून पसार झाले. सकाळी हा प्रकार लक्षात येताच बालगृह प्रशासनाची तारांबळ उडाली या प्रकरणी मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पळ काढलेल्या मुलांचा कसून शोध सुरू आहे    

अशी घडली घटना...

याबाबत अधिक वृत्त असे कि किरकोळ कारणावरून रागाच्या भरात घरातून लहान मुले पळून जात असल्याच्या घटना मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली अशा मुलासाठी शहरातील कॅम्प भागात बालगृह निर्माण करण्यात आला आहे. रेल्वेने पळून आलेल्या अल्पवयीन मुला-मुलीना आरपीएफ, रेल्वे पोलीस या बालगृहात नेऊन सोडल्यानंतर बाल गृहातील अधिकारी, कर्मचारी या मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना त्यां हवाली करतात.

कापडाची दोरी अन् पसार

या बालगृहात असलेल्या २२ अल्पवयीन मुले आहेत त्यापैकी तीन अल्पवयीन मुलांनी मध्यरात्री इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या खिडकीला कापडाची दोरी तयार केली आणि त्याच्या आधारे खाली उतरून पसार झाले .सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर बालगृह प्रशासनाची तारांबळ उडाली त्यांनी अगोदर या मुलांचा शोध घेतला मात्र ते आढळून न आल्यामुळे आज पोलीस स्थानकात तक्रार दिली.

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

मुलांचा तपास सुरु...

पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर या मुलांचा शोध सुरु केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी दिली. पलायन केलेल्या या अल्पवयीन मुला मध्ये २ उत्तर प्रदेश आणि १ मालेगावच्या मुलाचा समावेश आहे
जरूर वाचा-बीएलओ न्यायालयीन लड्याच्या तयारीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boys escaped remind home in manmad Nashik marathi news