"कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

"कुणाला काही सांगितले, तर तुझ्या नवऱ्याला आणि मुलांना मारून टाकीन', अशी दमदाटी करून वेळोवेळी बलात्कार केला. 16 नोव्हेंबरला विवाहितेचा मोबाईल पतीने तपासला असता, त्यामध्ये पंढरीनाथ आव्हाड याचे चार ते पाच कॉल आल्याचे दिसले. याबाबत पतीने जाब विचारून विवाहितेला मारहाण केली व घराबाहेर काढून दिले.

नाशिक : दोडी बुद्रुक (ता. सिन्नर) येथील तीसवर्षीय विवाहितेवर चुलत दिराने सतत एक वर्षे बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यास "मी फाशी घेईन आणि तुझ्या नवऱ्याला अडकवीन', अशी धमकी दिल्याचे पीडिताने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात संशयित पंढरीनाथ रघुनाथ आव्हाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

दोन्ही बाजूने अडकली 'ती'....

पीडिताने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की संशयित आणि आमची शेतजमीन शेजारी आहे. एक वर्षापूर्वी पीडित विवाहिता शेतात काम करीत असताना संशयिताने बलात्कार केला. त्यानंतर "कुणाला काही सांगितले, तर तुझ्या नवऱ्याला आणि मुलांना मारून टाकीन', अशी दमदाटी करून वेळोवेळी बलात्कार केला. 16 नोव्हेंबरला विवाहितेचा मोबाईल पतीने तपासला असता, त्यामध्ये पंढरीनाथ आव्हाड याचे चार ते पाच कॉल आल्याचे दिसले. याबाबत पतीने जाब विचारून विवाहितेला मारहाण केली व घराबाहेर काढून दिले. तसेच चुलत सासरे व इतरांनी मारहाण करून पंढरीनाथ आव्हाड याच्या घरी घेऊन गेले. मात्र, पंढरीनाथ आव्हाड घरी नव्हता. रात्री भाचाने मला आश्रय दिला. 17 नोव्हेंबरला पीडित महिलेला पंढरीनाथ आव्हाड याने फोन करून सुरेगाव येथे बोलावले.

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

तेथेही आठ ते नऊ दिवस बलात्कार...

तेथेही मारहाण करून दुचाकीवरून बळजबरीने पिंपळगाव ढेपा (ता. संगमनेर) येथे नेले. तेथे एका महिलेकडे नेले. त्या महिलेने आम्हाला एक खोली राहण्यासाठी दिली. तेथे आठ ते नऊ दिवस त्याने बलात्कार केला. आश्रय दिलेल्या महिलेला सर्व हकीकत सांगितली. त्या महिलेने माझ्या पतीशी मोबाईलवरून बोलले. नंतर आश्रय दिलेल्या महिलेने मला वावी पोलिस ठाण्यात आणले. तेथे मी तक्रार दिली. नंतर मला भाऊ सोनूशी (ता. संगमनेर) येथे घरी घेऊन गेला. याप्रकरणी वावी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brother-in-law rape brother,s wife Crime Nashik Marathi News