
Nandurbar Fire Accident : शॉर्टसर्किट होऊन इमारतीला आग लागल्याची घटना तळोद्यात शुक्रवारी (ता. १३) घडली. आगीत इमारतीच्या दुकानातील वस्तू खाक झाल्याने संबंधितांचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले.
दरम्यान, तळोदा पालिका इमारतीचा हाकेच्या अंतरावर आग लागली असतानाही आग विझविण्यासाठी पाचारण केलेल्या तळोदा पालिकेचा अग्निशामक बंब वेळेवर पोहचू शकला नाही. (Building fire due to short circuit nandubar news )
त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, यानिमित्त पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
येथील आंबेडकर चौकात हिफाजतअली सफदरअली यांची दोन मजली इमारत आहे. या इमारतीत हिफाजतअली यांचे ‘महाराष्ट्र जनरल स्टोअर्स’ आहे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी हिफाजत अली यांनी दुकान उघडले असता अचानक दुकानात शॉटसर्किट होऊन दुकानाला आग लागली. त्यामुळे आगीचे धूर व लोळ दिसू लागले.
दुकानाला आग लागल्याचे दिसताच नागरिक मदतीसाठी धावून आले. काही नागरिकांनी आग विझविण्यासाठी तळोदा पालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधून माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु अग्निशमन दलाचे वाहन वेळेवर न आल्याने अखेर नागरीकांनी मिळेल त्या साधनाने आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
आग विझवण्यासाठी तरुणांनी इमारतीवर चढून दुकानाचे पत्रे वर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. नीलेश नरभवर, रोहित ठाकरे, कार्तिक शिंदे, साहिल नरभवर, रमजू अन्सारी, शोईब अन्सारी, सावन ठाकरे, आकाश पाडवी, आश्विन पाडवी यांनी आग विझवली.
आगीत दुकानातील वह्या, पुठ्ठे, पुस्तके, कपडे जळून खाक झाल्याने हिफाजतअली यांचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले. याबाबत हिफाजतअली सबदरअली यांनी तळोदा पोलिसांत खबर दिली असून, पोलिसांत अग्नीउपद्रावी नोंद करण्यात आली असून तपास पोलिस कॉन्स्टेबल सुधीर गायकवाड, हर्षल साळुंखे तापस करीत आहेत.
पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह
इमारतीच्या दुकानाला आग लागल्यावर लागलीच परिसरातील नागरिकांनी तळोदा पालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधून माहिती दिली होती. इतकेच काय तर ज्याठिकाणी आग लागली तेथून तळोदा पालिकेची इमारत हाकेच्या अंतरावर आहे. मात्र असे असूनही अग्निशमन दलाचे वाहन आग विझविण्यासाठी वेळेवर आले नाही.अखेर नागरीकांनी मिळेल त्या साधनांनी पाणी वाहून आगीवर नियंत्रण मिळवले. यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यानिमित्ताने पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.