Nandurbar News : तळोद्यात घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bulglary News

Nandurbar News : तळोद्यात घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास

तळोदा : शहरातील खानदेशी गल्लीत भरवस्तीतील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.

त्यामुळे भरवस्तीतील घरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात गल्लीतील आधीच्या चोरीतील चोरांचा शोध लागत नाही तोच दुसरी चोरी उघडकीस आली आहे. त्यामुळे चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांना मिळाले आहे. (Burglary at taloda challenge to police to imprison thieves of gold and silver jewellery theft Nandurbar News)

हेही वाचा: Nashik News : निधी खर्चासाठी ZPत धावपळ; तालुकानिहाय पंचायत समित्यांमध्ये बैठकांचा सपाटा

खानदेशी गल्लीत टॅक्सी ड्रायव्हर असलेले विनोद वाघ यांचे घर आहे. दोन दिवसांपूर्वी ते त्यांच्या सासुरवाडी असलेल्या शिरपूर येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.

लोखंडी कपाटात ठेवलेले दहा हजार रुपये, पाच ग्रॅमचे सोन्याचे झुमके, सहा ग्रॅमचे सोन्याचे तुकडे, दहा तोळे चांदीचे जुळवे, आठ तोळे चांदीचे तुकडे असा मुद्देमाल नेला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

भरवस्तीत चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दीड महिन्यापूर्वीच खानदेशी गल्लीतच सचिन पंचभाई यांच्याकडेदेखील घरातून दागिने लंपास करण्यात आले होते, तर ठाणेदार गल्लीतून लाखो रुपयांची रोकड चोरून नेली होती.

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हेही वाचा: Jalgaon News : संकुलाच्या पार्किंगमधील दुकानांचे गौडबंगाल

त्यामुळे शहरातील वाढत्या चोऱ्यांना नागरिक कंटाळले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. त्यामुळे शहरातील वाढत्या चोऱ्यांना पायबंद घालण्यासाठी चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांना मिळाले आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल व पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. उपनिरीक्षक प्रिया वसावे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Nashik News : चोंढीला बिबट्या जाळ्यात; मात्र सुटकेच्या प्रयत्नात जखमी