Dhule News : वाहन लुटणाऱ्या एकास अटक; LCBची कारवाई

Police officers and staff present during the interrogation with the suspect in the carjacking gang.
Police officers and staff present during the interrogation with the suspect in the carjacking gang.esakal

Dhule News : वाहनांना रस्त्यावर अडवून लूटमार करणाऱ्या टोळीतील एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली. त्याच्याकडून १३ हजारांचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्याच्या साथीदारांचाही शोध सुरू करण्यात आला आहे.

-ट्रकचालक मोहम्मद सिद्धीक शब्बीर (वय ३७, रा. गल्ली क्रमांक ०३, इस्लामाबाद, मालेगाव) वाहनाद्वारे (एमएच ४१, जी ७४८८) सुरत येथून कपड्याचा माल भरून मालेगाव येथे परत येत होते. (car thief arrested Action of LCB Investigation of gang continues by Dhule police Dhule Crime News )

यादरम्यान ८ जानेवारीला पहाटे पाचच्या सुमारास एका पिक-अपमधून आलेल्या काही अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचे वाहन अडविले. फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेले मोहम्मद तोफैल वकील अहमद यांना मारहाण करीत दोघांचे मोबाईल हिसकावले. तसेच वाहनाच्या काच फोडून नुकसान केले.

याबाबत मोहम्मद सिद्धीक शब्बीर यांच्या फिर्यादीनुसार साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू झाला.

यात पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने जायखेडा पोलिस ठाणे हद्दीतून शुभम ऊर्फ गण्या साहेबराव खैरनार (वय २२, रा. वाडीपिसोळ, जायखेडा, ता. बागलाण, नाशिक) यास ताब्यात घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police officers and staff present during the interrogation with the suspect in the carjacking gang.
Dhule Crime News : वाद सोडविण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण

त्याच्याकडून १३ हजार किमतीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यास तपासासाठी साक्री पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

तसेच टोळीतील इतर संशयितांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, अमोल जाधव, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.

Police officers and staff present during the interrogation with the suspect in the carjacking gang.
Dhule News : कागदपत्रांची डिजिटल कॉपी लॉकरला जतन करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com