

नंदुरबार : व्हिडिओ कॉल (Video Call) करून अश्लील चित्रीकरण करून बदनामीची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या टोळीचा शुक्रवारी (ता. ३) पुन्हा तिसरा गुन्हा उजेडात आला. या प्रकरणामुळे गाव सोडावे लागणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांच्या आवाहनानंतर शुक्रवारी (ता. ३) टोळीतील काही जणांविरुद्ध तक्रार दिल्याने उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
व्हिडिओ कॉल करून, तसेच ते रेकॉर्ड केल्याचे भासवून पीडित व्यक्तींना बदनाम करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीविरुद्ध शहादा, नंदुरबार शहरानंतर गुजरातमधील तापी जिल्ह्यातील निझर येथील एका ज्येष्ठ नागरिकाने तिसरी तक्रार पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याकडे केली. त्यांनी पोलिस अधीक्षकांसमोर घडलेला प्रकार कथन केला.
तक्रारीत अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करणारी महिला, तिची साथीदार महिला, गोविंदा व बॉबी यांनी सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी तक्रारदारांचा अश्लील व्हिडिओ तयार केला होता. तो अश्लील व्हिडिओ तक्रारदारांच्या नातेवाइकांना व सोशल मीडियावर व्हायरला करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीचे पैसे देत नाहीत, तोपर्यंत त्यांनी तक्रारदाराला महिलेच्या घरात डांबून ठेवले होते. खंडणीच्या दहा लाख रुपयांपैकी ३० हजार रुपये घेतल्यावर त्यांची सुटका केली होती. ही रक्कम स्वीकारल्यावरही पीडित व्यक्तीचा बनविलेला अश्लील व्हिडिओ व फोटो निझर येथील त्यांचे नातेवाईक व गावातील व्हॉट्सॲपवर प्रसारित केले. त्यामुळे तक्रारदार व्यथित झाले. ते त्यांचे राहते घर व गाव सोडून परजिल्ह्यात निघून गेले होते. तक्रारदारांना महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते शुक्रवारी तक्रार देण्यासाठी आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.