Dhule News : रेड्याच्या वेदना कळतात; धुळेकरांच्या का नाहीत? : माजी आमदार प्रा. शरद पाटील | case of housing tax increased case Shiv Sena former MLA Prof. Sharad Patil angry question Dhule News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

Dhule News : रेड्याच्या वेदना कळतात; धुळेकरांच्या का नाहीत? : माजी आमदार प्रा. शरद पाटील

Dhule News : उदासीन महापालिकेला जाग आणण्यासाठी रेड्याच्या पाठीवर “महापालिकेची हुकुमशाही, वाढीव घरपट्टी रद्द करा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा”, असा रंगीत मजकूर लिहीला.

रेड्याची मिरवणूक काढत शिवसेनेच्या ठाकरे गटाने ३१ मेस महापालिकेच्या उदासीनतेचा आंदोलनातून निषेध नोंदविला. या प्रकरणी शहर पोलिसांनी भाजपच्या दबावाला बळी पडून शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांवर रेड्याला वेदना दिल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला. (case of housing tax increased case Shiv Sena former MLA Prof. Sharad Patil angry question Dhule News)

महापालिका व पोलिसांना रेड्याच्या वेदना कळतात, मात्र धुळेकरांच्या वेदना का कळू नयेत, असा संतप्त सवाल माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी पत्रकाव्दारे उपस्थित केला.

प्रा. पाटील यांच्या निवेदनाचा आशय असा ः शहर व जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई, धुळेकरांवर लादलेल्या अव्वाच्या सव्वा घरपट्टीच्या निषेधार्थ आणि महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाविरोधात चालविलेल्या जनआंदोलनातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिकेवर रेड्याची मिरवणूक काढली.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याने या आंदोलनकर्त्यांवर रेड्याला वेदना दिल्याची भावना व्यक्त करत ठाकरे गटाच्या सात पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविला आहे.

सतत निषेध आंदोलन

शहरात तीन महिन्यांपासून १५- १५ दिवस पाणी मिळत नाही. वर्षभरापासून अक्कलपाडा योजनेचे पाणी उद्याच देणार, अशा वल्गना भाजपच्या खासदारांपासून महापौरांपर्यंत सर्वच पदाधिकारी करीत आहेत.

शहरात समाविष्ट झालेल्या ११ गावांसह धुळेकरांना गेल्या साडेचार वर्षापासून कुठल्याही नागरी सुविधा न देता प्रचंड प्रमाणात वाढीव घरपट्टीची बिले पाठविली गेली आहेत. चार महिन्यांपूर्वी शिवसेनेने पालिकेवर मटका मोर्चा काढून आंदोलन केले.

तसेच हंडा मोर्चा, हंड्याची तिरडी मोर्चा काढून निषेध नोंदविणे सुरू ठेल्यानंतरही महापालिका प्रशासन सुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे या निषेधार्थ रेड्याची मिरवणूक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, असे आंदोलन पक्षाने केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अधिकारी असंवेदनशील

रेड्याच्या आंदोलनाची दखल घेत शहर पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्याप्रकरणी शिवसेनेचे नंदुरबार संपर्कप्रमुख व माजी आमदार पाटील, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ. सुशिल महाजन, महिला आघाडीच्या संघटीका हेमा हेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

त्याचबरोबर जिल्हा प्रशासन अक्कलपाडा प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी दीड महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याने ग्रामस्थांची नाराजी वाढली आहे. शहरासह ग्रामीण भागातील रहिवासी पाण्यासाठी वणवण करीत आहेत.

या स्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाशिवसेनेने जो रेडा आणला होता, त्यालाही पाणी लागते. त्याची वेदना महापालिकेसह पोलिसांना कळाली, पण धुळेकरांची वेदना अधिकाऱ्यांना का कळत नाही असा सवाल असल्याचे प्रा. पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.