राष्ट्रवादी काँग्रेस एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकला - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

राष्ट्रवादी पक्ष स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. भारतीय राजकारणाचा अभ्यास असल्याने ते कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत बघायला मिळाले. संसदेत देखील त्यांच्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दिसून आली. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला कायमचा मुकला असल्याच्या शोक भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव माजी खासदार डी.पी त्रिपाठी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी हानी झाली आहे. भारतीय राजकारणातील गाढा अभ्यासक हरपल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एका जेष्ठ मार्गदर्शकाला मुकला आहे अशा शोक भावना मंत्री ना.छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

राजकारणातील गाढा अभ्यासक हरपला... - भुजबळ

राजकीय अभ्यास आणि दांडगा जनसंपर्क असल्याने त्या काळात काँग्रेसशी जोडले गेले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे ते राजकीय सल्लागार होते. विविध भाषांचा अभ्यास असल्याने त्यांनी देशात आणि देशाबाहेरील विविध विद्यापीठामध्ये मार्गदर्शन देखील केले होते. अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस, ज्योती बाबू या दिगग्ज नेत्यांसोबत त्यांनी काम केले होते.काँग्रेस नंतर ते पुढे शरद पवार साहेब यांच्याशी जोडले गेले. राष्ट्रवादी पक्ष स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. भारतीय राजकारणाचा अभ्यास असल्याने ते कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत बघायला मिळाले. संसदेत देखील त्यांच्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दिसून आली. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला कायमचा मुकला असल्याच्या शोक भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे. शोक संदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, उत्तरप्रदेशमधील सुलतानपूर जिल्ह्यातील मालिकपूर या छोट्याश्या गावात जन्मलेले डी.पी. त्रिपाठी यांनी इलाहाबाद विद्यापीठात महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढे जेएनयु विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेतले या विद्यापीठाचे ते अध्यक्षही राहिले.

हेही वाचा > पं.स.निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीला 'इथे' दाखविला ठेंगा!

हेही वाचा > छतावरुन आत्महत्या करण्यासाठी पाऊल पुढे टाकणार....तेवढ्यातच.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chagan bhujbal statement on D.P.Tripathi,s sad demises nashik Marathi News