फ्लॅटचा व्यवहार ठरला...कमिशनची रक्कम दिली...अन् एजंटने मात्र केले असे काही...

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

बापू सुकदेव महाजन यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांचा फ्लॅट विक्रीला काढला आहे. गेल्या 8 तारखेला संशयित प्रकाश गुप्ता व त्याच्यासमवेत आणखी काही व्यक्ती बापू महाजन यांच्याकडे आल्या होत्या. त्या वेळी संशयित प्रकाश गुप्ता याने स्वत:ची ओळख इस्टेट एजंट अशी करून दिली होती. त्याच्यासमवेत असलेले संशयित ग्राहक असून, ते महाजन यांचा फ्लॅट पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. गुप्ता नामक असलेल्या ग्राहकाने फ्लॅट पसंत असल्याचे सांगत महाजन यांनी 35 लाख रुपये फ्लॅटची किंमत सांगितली.

नाशिक : गुरू गोविंदसिंग कॉलेज रोडवरील विक्रीला असलेला फ्लॅट खरेदीसाठी संशयित एजंटने बनावट ग्राहक आणले. फ्लॅटचा व्यवहार ठरला आणि त्यापोटीचे कमिशन देण्याचे ठरले. पण व्यवहाराची रक्कम देण्यापूर्वीच एजंटने कमिशनची आगाऊ 30 हजार रुपयांची रक्कम घेत फ्लॅटमालकाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भामट्यांकडून गंडा घालण्याचा हा नवीन प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. 

बनावट ग्राहक दाखवून केला सौदा...

बापू सुकदेव महाजन (रा. दूर्वांकुर अपार्टमेंट, जगन्नाथ चौकाजवळ, गुरू गोविंदसिंग कॉलेज रोड, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी त्यांचा फ्लॅट विक्रीला काढला आहे. गेल्या 8 तारखेला संशयित प्रकाश गुप्ता व त्याच्यासमवेत आणखी काही व्यक्ती बापू महाजन यांच्याकडे आल्या होत्या. त्या वेळी संशयित प्रकाश गुप्ता याने स्वत:ची ओळख इस्टेट एजंट अशी करून दिली होती. त्याच्यासमवेत असलेले संशयित ग्राहक असून, ते श्री. महाजन यांचा फ्लॅट पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. गुप्ता नामक असलेल्या ग्राहकाने फ्लॅट पसंत असल्याचे सांगत महाजन यांनी 35 लाख रुपये फ्लॅटची किंमत सांगितली. त्या वेळी संशयित एजंट प्रकाश गुप्ता याने व्यवहारावर एक लाख रुपये कमिशन राहील, असे सांगितले होते. फ्लॅटसंदर्भात महाजन आणि ग्राहक गुप्ता यांच्यात 32 लाख 11 हजार रुपयांमध्ये व्यवहार निश्‍चित करण्यात आला. त्या वेळी संशयित ग्राहकाने दोन लाख 11 हजार रुपयांचा धनादेश या व्यवहाराच्या बयाण्यापोटी देण्याचे ठरले, तर उर्वरित रक्कम आणि खरेदीखताचा व्यवहार फेब्रुवारीत करण्याचे त्यांच्यामध्ये ठरले.

PHOTOS : 'त्या' तिघांचा शोध घेत होते पोलीस...अचानक डोहात काहीतरी तरंगताना दिसले...शोध घेतल्यास समजले.....  

फ्लॅट खरेदीचा बहाणा; मालकाला घातला गंडा 

इस्टेट एजंट असलेल्या प्रकाश गुप्ता याने गिऱ्हाईक नागपूरहून आले असून, ज्या एजंटने त्यांना पाठविले आहे, त्यास तत्काळ 30 हजार रुपयांची गरज आहे. त्यासाठी त्याने ती 30 हजार रुपयांची रक्कम श्री. महाजन यांच्याकडून घेतली. मात्र त्यानंतर आतापर्यंत फ्लॅटच्या व्यवहारासंदर्भात कोणतीही हालचाल झाली नाही. बयाण्यापोटीची रक्‍कमही आली नाही. यासह 30 हजार रुपयांसंदर्भात महाजन यांनी इस्टेट एजंट प्रकाश गुप्ता याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. त्यामुळे एजंट गुप्ता याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर महाजन यांनी इंदिरानगर पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक गावित गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

मैत्रीत दगा...मित्राचाच मृतदेह टाकला शौचालयाच्या टाकीत...पण का?   

PHOTOS : माणुसकी निभावून दाखवूयाच!..'या' तरुणांचं ठरलं तर...     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheating in Flat sale by agent crime nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस