Child Marriage News : विधायक भारती, धडगाव पोलिसांनी रोखला बालविवाह; गाव बालसंरक्षण समितीने घेतली दखल

Sirsani: Villagers with Police Sub-Inspector Rahul Patil
Sirsani: Villagers with Police Sub-Inspector Rahul Patilesakal

Nandurbar News : सिरसाणी येथील अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे त्यांचे कुटुंबीय नियोजन करत होते. विधायक भारती व धडगाव पोलिस प्रशासन यांनी बालविवाह होऊ घातलेल्या लग्नापूर्वी अल्पवयीन मुलींच्या पालकांचे समुपदेशन करून बालविवाह रोखण्यात आला.

या अल्पवयीन मुलीचा विवाह अल्पवयीन मुलासोबत सिरसाणी गावात निश्चित करण्यात येत होता; परंतु विधायक भारती कार्यकर्ता दोन्ही कुटुंबे व जोडपे यांना असे करणे कायद्याने गुन्हा असल्याचे आणि त्याचा परिणाम याबाबत माहिती देऊन समुपदेशन करून त्यांचे मनपरिवर्तन केले.

शिवाय गावातील गाव बालसंरक्षण समिती सदस्यांना याविषयी सरपंच, ग्रामसेवक, पोलिसपाटील व पोलिस निरीक्षक यांना विधायक भारतीने योग्य त्या कार्यवाहीविषयी पत्रव्यवहार करून तसेच दोन्ही अल्पवयीन मुली आणि मुलाच्या पालकांना बालविवाहाचे परिणाम सांगून ताकीद देण्यात आली.(Child marriage stopped by Mhada Bharti Dhadgaon police Village Child Protection Committee took notice Nandurbar News)

दोन्ही अल्पवयीन मुलांच्या कुटुंबीयांना पालकांना ही बाब पटल्याने त्यांनी मुलीचे वय १८ व मुलाचे २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली.

दरम्यान, धडगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी अल्पवयीन दोन्ही मुलांना, आई, वडील व तेथे हजर असलेल्या नातेवाइकांचे व ग्रामस्थांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देत समुपदेशन केले.

बालविवाहाचे प्रमाण तालुक्यात अधिक आहे. त्यामुळे पोलिस दलाकडून सर्वसमावेशक असा अक्षता सेल तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून माहिती मिळताच बालविवाह रोखला जात आहे. समाजानेदेखील याबाबत संवेदनशील राहून बालविवाह होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

या वेळी पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील, पोलिस नाईक वारुडे, विधायक भारती- रूपसिंग पावरा, आपसिंग ठाकरे, राकेश पावरा, सरपंच कविता पावरा, उपसरपंच दारासिंग ठाकरे, पोलिस पाटील टुक्या पावरा, ज्येष्ठ नागरिक रेहांज्या पावरासह आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sirsani: Villagers with Police Sub-Inspector Rahul Patil
Nashik News : जिल्ह्यात 250 शिक्षकांचे निवृत्तिवेतन थकले; पालकमंत्र्यांसमोर केंद्रप्रमुख संघाची कैफियत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com