रात्रीस खेळ चाले! मध्यरात्रीच 'या' ठिकाणी एक हातगाडा लागतो..अन् मग...

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 22 December 2019

काही दिवसांपासून गोळे कॉलनीतील हॉटेल मनालीपासून काही अंतरावर एक हातगाडा लागतो. शहरातील हातगाड्यांना रात्री दहानंतर व्यवसाय करण्यास बंदी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हातगाड्यांवर पोलिसांकडून कारवाईही केली जाते. परंतु, गोळे कॉलनीत लागणारा हातगाडा रात्री उशिरापर्यंत म्हणजे, मध्यरात्री उलटूनही सुरूच राहतो.

नाशिक : शहराची मध्यवर्ती व्यापारी पेठ असलेल्या गोळे कॉलनीत मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या गाड्यांवर टवाळखोरांचा धुमाकूळ सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या गाड्यांवर आणि टवाळखोरांविरोधात गस्तीवर असलेल्या सरकारवाडा पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

मध्यरात्रीच या ठिकाणी एक हातगाडा लागतो... अन् मग...

गोळे कॉलनीत वैद्यकीय औषधांची मोठी व्यापारी पेठ असून, याच परिसरात हॉटेलही आहेत. तसेच, रहिवासी इमारतीही आहेत. काही दिवसांपासून गोळे कॉलनीतील हॉटेल मनालीपासून काही अंतरावर एक हातगाडा लागतो. शहरातील हातगाड्यांना रात्री दहानंतर व्यवसाय करण्यास बंदी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हातगाड्यांवर पोलिसांकडून कारवाईही केली जाते. परंतु, गोळे कॉलनीत लागणारा हातगाडा रात्री उशिरापर्यंत म्हणजे, मध्यरात्री उलटूनही सुरूच राहतो. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना हा हातगाडा दिसत नाही की जाणीवपूर्वक कारवाई टाळली जाते, असा प्रश्‍न गोळे कॉलनीतील त्रस्त नागरिकांकडून उपस्थित होत आहे. 

हेही वाचा > धरणावर फिरायला आलेले पर्यटक गाडीपाशी गेले..अन् गाडीत पाहिल्यावर धक्काच...कारण..

टवाळखोरांचा धुमाकूळ; नागरिक त्रस्त 

हातगाडा रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने रात्री उशिरापर्यंत टवाळखोर गाड्यावर बसलेले असतात. ते अक्षरश: धुमाकूळ घालतात. त्यांच्या या धुमाकुळीचा आणि टवाळखोरीचा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. यासंदर्भात काही नागरिकांनी सरकारवाडा पोलिसांकडेही तक्रार केली आहे. परंतु अद्याप कारवाई होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.

हेही वाचा > शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

हेही वाचा > पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय? 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens upset by the midnight vehicles Nashik Marathi News