Dhule District Collector : जिल्ह्यात यंदा 50 लाख वृक्षलागवड : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Dhule News : जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात ५० लाख वृक्षलागवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व विभागांनी वृक्षलागवडीचे सूक्ष्म नियोजन करावे.
 tree plantation
tree plantationesakal

Dhule News : जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात ५० लाख वृक्षलागवडीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व विभागांनी वृक्षलागवडीचे सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत नवीन नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. (Collector Abhinav Goyal statement 50 lakh tree plantation in district this year)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, विभागीय वन अधिकारी गजानन सानप आदी उपस्थित होते.

जागेची निश्‍चिती करावी

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की जिल्ह्यात या वर्षी पावसाळ्यात ५० लाख वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा अदांज घेऊन प्रत्येक विभागनिहाय वाटप करण्यात आलेले वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे.

वृक्षलागवडीसाठी प्रत्येक विभागाने अक्षांश व रेखांश पद्धतीने जागेची निश्चिती करावी. वृक्षारोपणासाठी उंच, कमीत कमी दीड ते दोन वर्षे वयाची दर्जेदार व गुणवत्तापूर्ण, पाण्याची उपलब्धता, हवामान, भौगोलिक परिस्थितीशी अनुरूप, परंतु स्थानिक प्रजातीच्या रोपांची उपलब्धता करावी. (latest marathi news)

 tree plantation
Dhule Municipality News : मनपा तिजोरीत एकाच दिवसात 30 लाख

रोपवाटिका करावी

एकूण ६० लाख रोपे तयार करण्यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि इतर योजनांतर्गत निधीतून रोपवाटिका विकसित करण्याचे नियोजन करावे. त्याचबरोबर कृषी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास विभाग, ग्रामपंचायत व अन्य विभागामार्फत मनरेगा व इतर उपलब्ध निधीतून रोपवाटिका सुरू करण्याबाबत, रोपांची उपलब्धता करण्याची कार्यवाही करावी.

मियावाकी पद्धत

वृक्षारोपण करताना मियावाकी पद्धतीचा वापर करावा. मियावाकी पद्धतीने वृक्षलागवडीसाठी गाव तेथे मियावाकी, ग्रामपंचायत, गायरान जमीन, पडीक जमीन, सरकारी शाळा, खासगी शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका, पालिकेच्या मोकळ्या जागेचा वापर करावा.

त्याचप्रमाणे वृक्षलागवडीसाठी प्रत्येक गावात बिहार पॅटर्न, अकोला पॅटर्न, कन्या वनसमृद्धी योजनेच्या माध्यमातून वृक्षारोपण करावे, बांबू लागवडीसाठी तसेच कृषी विभागाने मनरेगांतर्गत तसेच विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे. वृक्षारोपणासाठी विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली. उपजिल्हाधिकारी मुंडावरे यांनी पीपीटीद्वारे माहिती दिली.

 tree plantation
Dhule Summer Heat : किमान तापमानही वाढल्याने ‘वैताग’; विजेच्या लपंडावाने त्रासात भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com