नगरमुळे उत्तर महाराष्ट्रात वाढली कोरोनाची चिंता! खानदेश मात्र शून्याकडे

corona
coronae sakal

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची टक्केवारी पुन्हा वाढली आहे. खानदेशातील तिन्ही जिल्हे शून्य टक्केवारीच्या दिशेने जात असताना उत्तर महाराष्ट्रात नगर जिल्ह्याचा संसर्गदर मात्र अजूनही पाच टक्क्यांपेक्षा कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे लगतच्या नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.

राज्यभर सगळीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटत असताना सिंधुदुर्ग (५.७), नगर (७.७), सातारा (७.१), पुणे (६.२), सांगली (६.२), कोल्हापूर (५.१) या जिल्ह्यांचा संसर्गदर मात्र पाच टक्क्यांच्या पुढेच आहे. यात नगर जिल्ह्यातील संसर्गदर चिंतेचा विषय आहे. ठाणे, औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या अडीच ते तीन टक्क्यांच्या आसपास रेंगाळत आहे. गेल्या आठवड्यात दोन टक्क्यांपेक्षा कमी असलेला दर या आठवड्यात पुन्हा तीन टक्के झाला आहे. खानदेशातील तिन्ही जिल्हे शून्य टक्क्याकडे निघाले असताना, नाशिकला मात्र हा दर तीन टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर नगर जिल्ह्याचा संसर्गदर ५.९ टक्के आहे. पुणे-नगर-नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमुळे उत्तर आणि पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख ठराविक टक्केवारीच्या खाली यायला तयार नसल्याचेच हे द्योतक आहे.

corona
कोबीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव; पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

दोन आठवड्यांतील चित्र

जिल्हा - पॉझिटिव्ह - संसर्गदर (टक्के) - पॉझिटिव्ह संसर्गदर (टक्के)

नगर- ३४३९ - ७.७ - ६२६३ - ५.९

ठाणे -१७९५ -३.७ -२४०९ -१.६

औरंगाबाद -२०३ -३.२ -४१६ -२.०

पालघर- ३८४ -२.६ -४४७ -२.२

खानदेश शून्याकडे

जळगाव - १८ - ०.१

नंदुरबार - ०५ - ०.४

धुळे - १२ - ०.६

corona
नाशिक सिटी बससेवा सुसाट; हजारो प्रवाशांचा उस्फूर्त प्रतिसाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com