Vidhan Sabha 2019 : काँग्रेसचे आमदार कांशीराम पावरा भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

पावरा यांच्यासोबत शिरपूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. 

शिरपूर : येथील काँग्रेसचे आमदार कांशीराम पावरा यांनी अखेर आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार पावरा यांच्यासोबत शिरपूर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. 

Vidhan Sabha 2019 : भाजपच्या मेगाभरतीत दोन नेत्यांचा प्रवेश

तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असतांनाच आमदार पावरा यांच्या भाजप प्रवेशाचे सुतोवाच झाले होते. मात्र प्रवेश कधी होणार याबाबत अनिश्चितता होती. आज प्रवेश झाल्यानंतर येथील भाजपचे उमेदवार म्हणून कांशीराम पावरा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. आता शिरपूर काँग्रेसचे सर्वेसर्वा आमदार अमरिषभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपन पटेल हे भाजपमध्ये कधी जाणार याची प्रतीक्षा सर्वांना लागून आहे.

Vidhan Sabha 2019 : गोपीचंद पडळकरांना बारामतीची उमेदवारी; मुख्यमंत्र्यांची इच्छा

शिरपूर मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानंतर परमसंत ठाकूरसिंह महाराज सत्संग परिवाराचे अनुयायी असलेले आमदार कांशीराम पावरा 2009 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसतर्फे आमदार म्हणून निवडून गेले. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसतर्फे सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आमदार अमरिषभाई पटेल यांच्या पक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे आ.पटेल यांचे कट्टर समर्थक असलेले कांशीराम पावरा भाजपमध्ये जाणार हे निश्चित होते. मात्र त्यांनी आ.पटेल यांच्यापुर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद सदस्य असा आ.कांशीराम पावरा यांचा प्रवास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress MLA kashiram pawara enters in BJP before maharashtra vidhansabha 2019