नंदुरबार : कॉपर वायरची चोरी करणारी टोळी जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Theft

नंदुरबार : कॉपर वायरची चोरी करणारी टोळी जेरबंद

नंदुरबार : सुझलॉनच्या पवन उर्जा कंपनीच्या टॉवरमधील कॉपर वायरची चोरी करून लाखोचा गंडा घालणाऱ्या टोळीतील आठ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल आहे. त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रूपये किमतीची कॉपर वायर हस्तगत करण्यात आली आहे. (Copper wire theft gang arrested in Nandurbar)

चोरीस गेलेली ताब्यांच्या बसबार पट्टया या रजाळे येथील पवन ऊर्फ प्रशांत कोळी व त्याचे मित्र यांनी मिळून चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एक पथक तात्काळ रजाळे व ढंडाणे येथे पाठवुन संशयित पवन कोळी व त्याचा मित्र सुकदेव कोळी, शेरसिंग ठाकरे यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांसह इतर काही गुन्हे केले असल्याचे कबुल करुन त्याच्या इतर साथीदारांबाबत माहिती दिली. साथीदारांपैकी देविदास भाईदास भिल (रा. शनिमांडळ तिलाली), हिरामण भिल, रवींद्र भिल (रा.तिलाली ता. नंदुरबार), आनंदसिंग भिल, (रा . बलवंड) यांना ताब्यात घेण्यात आले. तांब्याची तार ही दोंडाईचा येथील सईद मुसा खाटीक यास विकल्याचे सांगितले. त्यामुळे दोंडाईचा येथे सईद मुसा खाटीक, (रा. राणीपुरा होळी चौक, दोंडाईचा ता.शिंदखेडा) यास ताब्यात घेण्यात आले .

टॅग्स :NandurbarCrime News