Nandurbar Crime News : नवीन रेशनकार्डासाठी लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीसह संगणक चालकाविरुद्ध गुन्हा

crime news
crime newssakal

Nandurbar News : नंदुरबार तहसील कार्यालय आवारात नवीन रेशनकार्डसाठी एक हजाराची लाच घेणाऱ्या खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी खासगी व्यक्तीसह संगणक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उमर्दे बु. (ता. जि. नंदुरबार) येथील तक्रारदार यांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी नवीन रेशनकार्ड बनविण्याकरिता नंदूरबार तहसील कार्यालय येथे अर्ज व कागदपत्रे बनविली होती.

यावेळी खासगी लेखनिक वसीम बशीर पिंजारी (वय २६, रा.देसाईपुरा, नंदुरबार) याने तक्रारदार यांना माझे तहसील कार्यालयात ओळखी असून मी रेशनकार्ड बनवून देईल, असे सांगितले होते. (Crime against private person taking bribe for new ration card along with computer operator Nandurbar Crime News)

crime news
Jalgaon NCP News : संजय पवार अखेर राष्ट्रवादीतून बडतर्फ

याबाबत वेळोवेळी तक्रारदार यांनी रेशनकार्डसाठी वसीम पिंजारी व तहसील कार्यालय येथे पाठपुरावा केला, परंतु तक्रारदार यास रेशनकार्ड मिळाले नाही.

९ मे रोजी वसीम पिंजारी यांनी तक्रारदाराकडे रेशनकार्ड बनवून देण्यासाठी पुन्हा एक हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने १६ मे रोजी लाचलुचपत विभागाच्या नंदुरबार कार्यालयात तक्रार दिली. काल (ता.१६) व आज पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत वसीम पिंजारी याने स्वतःसाठी सातशे रुपये व संगणक चालक शिशुपाल घुगे (वय ३२) यांच्यासाठी तीनशे रुपये अशी एकूण एक हजार रुपये लाचेची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

crime news
Jalgaon News : आला..रे आला मन्या आला अन्‌ माफी मागुन गेला; वाळू माफियाचा बिंधास्त स्टंट

तसेच विशाल घुगे यानेसुद्धा रेशनकार्ड साठीची फी वसीम पिंजारी याच्याकडे देण्यास तक्रारदार यांना सांगितले.

त्यानंतर आज वसीम यास नंदूरबार तहसील कार्यालय आवारात पंच साक्षीदारांसमक्ष एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी वसीम पिंजारी व विशाल घुगे यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

crime news
Jalgaon BJP News : भाजप जिल्हाध्यक्षपदाची शनिवारी निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com