धुळे- अजनाळे व हेंकळवाडी (ता. धुळे) परिसरात सोशल मीडियावरून लुटीचा सापळा रचणाऱ्या टोळीला धुळे पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखांची रोकड जप्त केली. न्यायालयाने त्यांची २८ मेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी आतापर्यंत आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ‘एक लाखाचे सात लाख, दोन लाखांचे १५ लाख मिळेल’ अशा बनावट इंडियन करन्सीच्या रिल्स इन्स्टाग्राम व फेसबूकवर टाकून तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या या टोळीने अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.