धुळे: संशयिताने बतावणी करत येथील निदान पॅथॉलॉजी लॅबमधील डॉ. प्रशांत देवरे यांची फसवणूक केली. ते लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिसांनी जलदगतीने तपास करत डॉ. देवरे यांना ८३ हजाराची रक्कम परत मिळवून दिल्याने त्यांना दिलासा मिळाला.