Nandurbar News : गोमाई नदीपात्रात म्हसावदच्या तरुणाचा मृतदेह

death
death esakal

Nandubar News : येथील गोमाई नदीपात्रात तरुणाचा मृतदेह मंगळवारी (ता. ९) सकाळी सहाला तरंगताना आढळला. ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी गर्दी केली होती. (Dead body of Mhasavad youth in Gomai river basin nandurbar news

प्रकाशा (ता. शहादा) येथील गौतमेश्वर महादेव मंदिराजवळील गोमाई नदीपात्रात मंगळवारी सकाळी सहाला ग्रामस्थांना एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला. सत्तार सलाउद्दीन पिंजारी (वय २५, रा. म्हसावद, ता. शहादा) असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

death
Crime News : नाचताना धक्का लागल्याने तरुणास भोसकले

यापूर्वीच सलाउद्दीन हरवल्याची नोंद म्हसावद पोलिस ठाण्यात केली होती. येथील सीताराम भगत, प्रभू परदेशीभोई, गणपत भिल यांनी मृतदेह काठावर ओढून आणला. नातेवाइकांनी विच्छेदनासाठी मृतदेह म्हसावद ग्रामीण रुग्णालयात नेला. याबाबत पोलिसांत नोंद झाली असून, जमादार मेहरसिंग वळवी, हवालदार रामा वळवी आदी तपास करीत आहेत.

death
Nandurbar News : कर न भरणारी 46 दुकाने सील; प्रशासक पुलकित सिंह यांची दबंग कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com