Inspire Awards : राष्ट्रीय इन्स्पायर ॲवॉर्डसाठी दीपची निवड; बनवले 'Labour's friend' नावाचे उपकरण!

Deep patil selection for National Inspire Award for making device called Labours Friend nandurbar news
Deep patil selection for National Inspire Award for making device called Labours Friend nandurbar newsesakal

नंदुरबार : इन्स्पायर ॲवॉर्ड (Inspire Award) प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रॉफ हायस्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. (Deep patil selection for National Inspire Award for making device called Labours Friend nandurbar news)

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग व नॅशनल इनोव्हेटिव्ह फाउंडेशन गुजराततर्फे झालेल्या इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात श्रॉफ हायस्कूलचा दीप पाटील याचा उपकरणाची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. याची नोंडेल एजन्सी म्हणून महाराष्ट्रामध्ये राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूर ही आहे.

गेल्या महिन्यात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड ऑनलाइन पद्धतीने प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात नंदुरबार जिल्ह्यातून श्रॉफ हायस्कूलचा विद्यार्थी दीप योगेश पाटील यांच्या लेबर्स फ्रेंड नावाच्या उपकरणाची राज्यस्तरावर क्रमांक मिळवून राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली. या विद्यार्थ्याला विद्यालयाच्या उपशिक्षिका चेतना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

मार्गदर्शक शिक्षिका चेतना पाटील यांनी या उपकरणाला कामगारांचा मित्र असे नाव दिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांच्या हस्ते चेतना पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Deep patil selection for National Inspire Award for making device called Labours Friend nandurbar news
SAKAL Anniversary : वर्धापन दिनी ‘सकाळ’वर शुभेच्‍छांचा वर्षाव! शैक्षणिक साहित्‍याच्‍या मदतीसाठी सरसावले वाचक

संस्थेचे अध्यक्ष ॲड. रमण शाह, संस्थेचे सचिव डॉ. योगेश देसाई, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, उप मुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील आदींनी यशस्वी विद्यार्थी दीप पाटील, चेतना पाटील यांचे अभिनंदन केले.

मजुरांचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न

सदर उपकरण तयार करताना डोक्यावर ओझे वाहणाऱ्या मजुरांचा, डोक्यावर ओझे ठेवून विक्री करणाऱ्यांचा तसेच, घरातील महिलेला भरलेले सिलिंडर उचलण्यासाठी होणाऱ्या त्रासाचा विचार करण्यात आलेला आहे.

हे उपकरण तयार करताना अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांशी प्रत्यक्ष संवाद साधून तसेच नंदुरबार येथील नामांकित अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुनील पाटील यांची भेट घेऊन, अशाप्रकारे ओझी उचलल्यामुळे होणाऱ्या पाठीमागील हाडांच्या तक्रारी समजून घेतल्या व त्यावर उपाय म्हणून सरळ डोक्यावर ओझे न उचलता त्या ओझ्याचे वजन खांद्यावर तसेच कमरेवर विभागले जाऊन हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला.

Deep patil selection for National Inspire Award for making device called Labours Friend nandurbar news
Nail Painting : नखचित्रकलेतून साकारली भगवद्गीता; ज्ञानेश्‍वर सोनवणे यांचे कौशल्य!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com