Nandurbar Agriculture News : 24 हजार क्विंटल बियाण्यांची मागणी; बळीराजा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला

BT-Seed
BT-Seedesakal

Nandurbar News : खरीप हंगामासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी कामाला लागला असून कृषी विभागाने महाबीजकडे ६ हजार ६५४ क्विंटल तर खासगी कंपन्यांकडे १७ हजार ५८९ क्विंटल अशी एकूण २४ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. (Demand for 24 thousand quintal seeds in nandurbar news)

मात्र सर्व शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध होत, जिल्ह्यात कोठेही बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा पावसाचे प्रमाण सरासरी राहणार असल्याच्या अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून मागील काळात झालेल्या अवकाळी पावसाचे दुःख बाजूला सारत बळीराजा नव्या जोमाने खरिपाच्या तयारीला लागलेला आहे. त्यासाठी शेतकरी नियोजन करीत असून बियाण्यांची खरेदी करताना दिसत आहे.

शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा कृषी विभागामार्फत महाबीज व खासगी कंपन्यांकडे बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी बाजरी, तूर, मुग, सूर्यफूल, भुईमूग, उडीद आदी पिकांच्या लागवडीकडे दुर्लक्ष करीत असल्याने, लागवडीच्या प्रमाणात दरवर्षी घट येत असून या पिकांसाठी त्यानुसार कमी बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

BT-Seed
Nandurbar News : सारंगखेडा बॅरेजमध्ये 38 टक्के जलसाठा; उन्हाची तीव्रता वाढल्याने घट

तर या खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, भात, आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता लक्षात घेता मक्यासाठी पाच हजार १०७ क्विंटल, सोयाबीनसाठी सात हजार ४७८ क्विंटल, भातसाठी तीन हजार ९६४ क्विंटल, ज्वारीसाठी दोन हजार ४०७ क्विंटल व कापूससाठी दोन हजार ७४० क्विंटलची मागणी कृषी विभागामार्फत महाबीज व खासगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

अनधिकृतकडे द्यावे लक्ष

दरम्यान ‘नेमीची येतो पावसाळा’ या उक्ती प्रमाणे कृषी विभाग दरवर्षी लागणाऱ्या बियाण्यांची मागणी नोंदविण्याचा सोपस्कार पार पाडून ते बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. मात्र अनधिकृत बियाणे विक्रेत्यांवर कारवाईसाठी पुढे येण्यासाठी धजावत नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे दरवर्षीच जिल्ह्यात शेकडो एकरावर अनधिकृत बियाणे अंकुरते. यामुळे जिल्हा कृषी विभागाने या गंभीर मुद्द्याकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

पिकांच्यानुसार बियाण्यांची मागणी (क्विंटलमध्ये) -

पीक महाबीज खासगी एकूण

सं. ज्वारी ९६३ १४४४ २४०७

सं. बाजरी १२ ११२ १२४

भात १५८५ २३७८ ३९६३

मका ५११ ४५९६ ५१०७

BT-Seed
Dhule News : सौंदाणेच्या सरपंचांसह दोन सदस्य अपात्र; अपर आयुक्तांचा निर्णय

तुर २५८ ३८८ ६४६

मुग ८८ १३२ २२०

उडीद १८८ २८२ ४७०

भुईमूग १०६ ९५७ १०६३

सूर्यफूल ०.५४ ४.८६ ५.४०

तीळ ०० ०१ ०१

सोयाबीन २९४० ४५३८ ७४७८

सं. कापूस ०१ ०५ ०६

सु. कापूस ०१ ११ १२

बीटी कापूस ०० २७४० २७४०

एकूण ६, ६५४ १७, ५८९ २४, २४७

BT-Seed
Dhule Agriculture News : जिल्ह्यात सव्वादहा लाख बीटी बियाणे पाकिटांची गरज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com