Navratri Festival : नवसपूर्तीसाठी भाविक येणार; धनदाईदेवी नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

Kulaswamini, the ancient temple of Kuladaivat Dhanadai Devi. In the second picture, an attractive idol of Dhandai Devi.
Kulaswamini, the ancient temple of Kuladaivat Dhanadai Devi. In the second picture, an attractive idol of Dhandai Devi.esakal

Navratri Festival : येथील कुलस्वामिनी, आदिमाया धनदाईदेवी मंदिराजवळ नवरात्रोत्सवात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील.

नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आदिमाया धनदाईदेवीचे मंदिर २४ तास खुले असणार आहे. मंदिर परिसराची साफसफाई केली जात आहे. (Dhandai Devi Navratri festival preparation started nandurbar news)

दहा दिवसीय नवरात्रोत्सवात देवीजवळ भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. दर्शन, नवसपूर्तीसाठी येणाऱ्या भाविकांनी मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष गजमल देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, खजिनदार उत्तमराव वंजी देवरे, सचिव महेंद्र दौलतराव देवरे व संचालक मंडळाने केले आहे. भाविकांच्या दृष्टीने चैतन्याचा उत्सव असणाऱ्या नवरात्रोत्सव मंदिराजवळ भाविकांची दहा दिवस मांदियाळी असणार आहे.

धनदाईदेवीला राज्यभरातील सुमारे ७७ पेक्षा अधिक कुळांचे भाविक कुलदैवत मानतात. नवरात्रोत्सवात लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात. डोंगराच्या कुशीत धनदाईदेवीचे पुरातन मंदिर आहे. देवीची स्वयंभू मूर्ती असून, श्रावण महिना, नवरात्रोत्सवासह चैत्र शुद्ध अष्टमीच्या यात्रोत्सवात लाखो भाविक दर्शन, नवसपूर्तीसाठी हजेरी लावतात.

चक्रपूजा व घटस्थापना

कुलदैवत मानणारे बहुतेक भाविक धनदाईदेवीजवळ चक्रपूजेला प्राधान्य देतात. यंदा १५ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवास आरंभ होत आहे. पहिल्या माळेस धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे घटस्थापना केली जाते. शिवाय मंदिरावर मानाचा ध्वज चढविला जातो. मंदिरावर विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.

कुलदैवत मानणारे भाविक देवीजवळ घटस्थापना करून दहा दिवस मुक्कामी असतात. मुक्कामी असणाऱ्या भाविकांसाठी देवीजवळ मोफत निवासाची सोय आहे. पंचमी, सप्तमी, अष्टमी व नवमीला भाविक चक्रपूजा व आरत्या लावण्यास विशेष प्राधान्य देतात.

पहाटेच्या काकड आरतीने चैतन्य

नवरात्रोत्सवात पहाटे साडेपाचपासून भाविकांची पावले मंदिराकडे वळतात. मंदिराजवळ अनेक वर्षांपासून पाच वाजून ४५ मिनिटांनी सामुदायिक काकड आरती केली जाते. आरतीसाठी स्थानिकांसह परिसरातील भाविकांची उपस्थिती असते. मंदिराजवळ नवरात्रोत्सव व कोजागरी पौर्णिमा उत्सवानिमित्त भाविक दर्शनासाठी विशेष प्राधान्य देतात.

Kulaswamini, the ancient temple of Kuladaivat Dhanadai Devi. In the second picture, an attractive idol of Dhandai Devi.
Navratri Festival : कोलकत्याच्या गंगा नदीतलं पाणी अन् मातीनं कोल्हापुरात साजरी होते 'नवरात्र'

भाविकांना दर्शन सुलभ, जलदगतीने व्हावे, मंदिर व परिसरात गर्दी थोपवून राहू नये म्हणून धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने नियोजन केले आहे. मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवेकरी व स्वयंसेवक लक्ष ठेवून असतात. शिवाय साक्री पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असेल. वीज उपकेंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य असते.

आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, तसेच स्थानिक ठिकाणच्या सर्व शाळांचे विद्यार्थी, गावातील शेकडो युवक, स्वयंसेवक म्हणून दहा दिवस सहकार्य करतील. गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारीदेखील सहकार्य करतात.

आदिमायेस रोज नवरंगांचा आहेर..! कुलदैवत धनदाईदेवीस नवरात्रोत्सवात दररोज नवरंगांचा आहेर, साजशृंगार चढविला जातो. आहेर चढविल्यानंतर सामुदायिक काकड आरती केली जाते. दररोज देवीजवळ अभिषेक केला जातो. रोज पहाटे व सायंकाळी महाआरती केली जात असल्याने भाविकांची गर्दी असते. नवरात्रोत्सवात दर्शन, नवसपूर्तीसाठी येणारे भाविक देवीला आहेर, साजशृंगार चढवितात.

दर वर्षी कुलदैवत,

आदिमाया धनदाईदेवीजवळ भाविकांची गर्दी वाढत आहे. भाविकांसाठी मंदिराजवळ शुद्ध, थंड मुबलक पाणी उपलब्ध असून, सावलीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. शक्य त्या सुविधा देण्यासाठी तरुण ऐक्य मंडळ प्रयत्नशील आहे.-सुभाष गजमल देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी

Kulaswamini, the ancient temple of Kuladaivat Dhanadai Devi. In the second picture, an attractive idol of Dhandai Devi.
Navaratri Festival : नेदरलॅंडच्या कलाकारांमुळे खुलणार नवरात्रीचे रंग
Kulaswamini, the ancient temple of Kuladaivat Dhanadai Devi. In the second picture, an attractive idol of Dhandai Devi.
Navratri Festival: कापडणेत जोगाईमाता अन्नपूर्णादेवीसह पाचपावली माता नवरात्रोत्सवाच्या तयारीस वेग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com