Dhule News : अनेर लाभक्षेत्रातील नाल्यांवरील बंधारे पुनर्भरणासाठी 27 कोटी मंजूर; आमदार पटेल, पावरांचा पाठपुरावा

Dhule News : अनेर मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सावेर (ता. शिरपूर) गावापुढे बंदिस्त विस्तारित कालवा प्रणाली तयार करण्यात येणार आहे.
Amrishbhai Patel, Kashiram Pawra
Amrishbhai Patel, Kashiram Pawraesakal

शिरपूर : येथील अनेर मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील नाल्यांवरील बंधारे पुनर्भरण कामासाठी २७ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यामुळे या परिसरातील जमीन ओलिताखाली येणार आहे. या कामासाठी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा यांनी पाठपुरावा केला होता. (Dhule 27 crore sanctioned for refilling dams on drains in Aner)

असे होणार काम

अनेर मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सावेर (ता. शिरपूर) गावापुढे बंदिस्त विस्तारित कालवा प्रणाली तयार करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नाल्यावरील बंधाऱ्यांचे पुनर्भरण केले जाणार आहे. या कामासाठी सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकास विस्तार व सुधारणेंतर्गत प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, २७ कोटी ३३ लाख ७३ हजार ६२५ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

अशी आहे परिस्थिती

अनेर धरण १९७६ मध्ये बांधण्यात आले असून, त्याला उजवा व डावा असे दोन कालवे आहेत. उजवा कालवा १४.२० किलोमीटर अंतराचा असून, त्यावर १४ वितरिका आहेत. उजवा कालवा धरणापासून सा.क्र. १९४७ मीटरवर असून, कालव्याचा विसर्ग १२५.५७ क्यूसेक (३.५५ क्यूमेक्स) इतका आहे. उजव्या कालव्यावरचे सिंचन क्षेत्र चार हजार ९३७ हेक्टर आहे.

डावा कालवा ५.८० किलोमीटर अंतराचा असून, त्यावर पाच वितरिका आहेत. डावा कालवा धरणापासून सा.क्र. २३५ मीटरवर असून, कालव्याचा विसर्ग २०.४८ क्यूसेक (०.५८ क्यूमेक्स) आहे. डाव्या कालव्यावरचे सिंचन क्षेत्र ८१० हेक्टर आहे. दोन्ही कालवे मिळून एकूण सात हजार १८० हेक्टरवर सिंचन करतात. (latest marathi news)

Amrishbhai Patel, Kashiram Pawra
Dhule: शिंदखेडा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी 28 कोटी 61 लाखांचा निधी; आमदार रावल यांच्या प्रयत्नाने विविध रस्ते होणार चकाचक

पुनर्भरणाचे नियोजन

अनेर उजवा कालवा वितरिका क्रमांक १४ वरील उपवितरिका क्रमांक ६ वर क्रमांक १, २ व ३ लघुवितरिका प्रस्तावित होत्या. त्यामुळे ७३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते. या कामाचे सर्वेक्षण, अंदाजपत्रके तयार करणे आदींचे नियोजनही करण्यात आले होते.

मात्र ते काम पुढे सरकले नाही. त्यामुळे ६.५५ दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी शिल्लक ३.५३ दशलक्ष घनमीटर पाणी बंद नलिका प्रणालीद्वारे सावेर ते भोरखेडादरम्यान असलेल्या नाल्यावर ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांत टाकून त्यांचे पुनर्भरण करण्याचे नियोजन आहे. पुनर्भरणामुळे पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

"शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांच्या मालिकेतून सिंचन क्षेत्रात भरीव वाढ करणे शक्य झाले आहे. अनेर धरणातील पाण्याचे व्यवस्थापन करून बंधाऱ्यांचे पुनर्भरण होणार असल्यामुळे या बंधाऱ्यांच्या क्षेत्रातील भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. राज्य शासनाने याकामी अत्यंत जलदगतीने प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली ही समाधानाची बाब आहे."

-अमरिशभाई पटेल, आमदार

Amrishbhai Patel, Kashiram Pawra
Teacher Recruitment : पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला खो वर खो! जिल्ह्यातील बेरोजगार भरतीप्रकियेच्या प्रतिक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com