Dhule News : शिंदखेड्यातील 25 ग्रामपंचायती इमारतींसाठी 5 कोटी 35 लाख; आमदार जयकुमार रावल यांची माहिती

Dhule News : राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पाच कोटी ३५ लाखांचा निधी आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार जयकुमार रावल यांनी दिली.
jaikumar rawal
jaikumar rawalesakal

Dhule News : जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघातील २५ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामासाठी राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पाच कोटी ३५ लाखांचा निधी आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार जयकुमार रावल यांनी दिली. (5 Crore 35 Lakh for 25 Gram Panchayat Buildings in Shindkheda)

jaikumar rawal
Amarnath Yatra 2024 : अमरनाथला गेल्यावर 'या' ठिकाणांना अवश्य द्या भेट

मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत ज्या ग्रामपंचायत इमारतींसाठी निधी मंजूर झाला, ती गावे अशीः शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी, धावडे, दाऊळ, तामथरे, खर्दे बु., कर्ले या गावांना प्रत्येकी २५ लाखांचा निधी तर वडदे, हिसपूर, कळगाव, चिमठावळ, मेलाणे, विखुर्ले, दरखेडा, वाघोदे, सुकवद, अजंदे, जखाणे, दत्ताणे, झोतवाडे या गावांतील ग्रामपंचायतीच्या बांधकामासाठी प्रत्येकी २० लाखांचा निधी मंजूर आहे. तसेच साक्री तालुक्यातील आयणे, उभंड, म्हसाळे, नागपूर व वर्धाने या गावांना प्रत्येकी २० लाखांची निधी असा एकूण पाच कोटी ३५ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे आमदार रावल यांनी म्हटले आहे.

jaikumar rawal
Maharashtra News Live Updates : प्रस्तावित नसातानाही पार्किंगचा घाट- प्रकाश आंबेडकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com