Dhule News : जिल्ह्यातील नाकाबंदीत 152 जणांवर कारवाई; पोलिसांकडून 83 हजारांचा दंड वसूल

Dhule : वाहनधारकांसह १५२ जणांवर विविध प्रकारची कारवाई केली. यात ८३ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला.
Police officers and employees present on the highway for inspection during the blockade.
Police officers and employees present on the highway for inspection during the blockade.esakal

Dhule News : जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने सलग तिसऱ्या‍ दिवशी नाकाबंदी आणि ऑल आउट ऑपरेशनअंतर्गत वाहनधारकांसह १५२ जणांवर विविध प्रकारची कारवाई केली. यात ८३ हजारांचा दंडही वसूल करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सलग तिसऱ्‍या दिवशी नाकाबंदी आणि ऑल आउट ऑपरेशन राबविले गेल्याने अनेकांचे धाबे दणाणले. या मोहिमेत ७७९ वाहने, तर ११७ बार, हॉटेल, ढाबे व लॉजेस्‌ची अचानक तपासणी केली. वाहनधारकांसह एकूण १५२ जणांवर कारवाई केली. वाहनधारकांकडून ८३ हजारांचा दंड वसूल केला. (Action against 152 people in blockade in district )

हद्दपार गुन्हेगार सापडला

जिल्ह्यात पाच जूनला रात्री अकरा ते मध्यरात्रीनंतर तीनपर्यंत ही मोहीम राबविली. ऑपरेशन ऑल आउटदरम्यान एलसीबीच्या पथकास देवपूर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हद्दपार गुन्हेगार करण ऊर्फ न्हानू सुनील दगडू मोरे (रा. किसान पाइप फॅक्टरीमागे, देवपूर) हा सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजेच धुळे शहरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला नगावबारी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात देवपूर पोलिस ठाण्यात तरतुदीनुसार गुन्हा दाखल झाला.

Police officers and employees present on the highway for inspection during the blockade.
Dhule News : वृक्षलागवड करा, तोड करू नका : आमदार अमरिशभाई पटेल

ठिकठिकाणी नाकाबंदी

जिल्ह्यात १६ पोलिस अधिकारी, ९६ पोलिस अंमलदारांनी एकूण १९ ठिकाणी नाकाबंदी करीत ७७९ दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी केली. तसेच ११७ बार, ढाबे, हॉटेल, लॉजेस व गेस्ट हाऊसची तपासणी केले. चार हिस्ट्रिशिटर गुन्हेगारांची तपासणी झाली. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या वीस केसेस करण्यात आल्या. पाच सोडा वॉटर हातगाडींवर कारवाई केली. तसेच १२७ वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाईत त्यांच्याकडून ८३ हजार ७५० रुपये दंड वसूल केला.

धिवरे यांची पाहणी

मोहिमेदरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी नाकाबंदी पॉइंट, काही हॉटेलची पाहणी केली. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी नाकाबंदी ठिकाणी पाहणी केली. सहायक पोलिस अधीक्षक एस. ह्रषीकेश रेड्डी, पोलिस उपअधीक्षक भागवत सोनवणे यांनी त्यांच्या नियंत्रण क्षेत्रात देखरेख ठेवली. आगामी विधानसभा निवडणुका, सण-उत्सवांच्या अनुषंगाने यापुढे वेळोवेळी नाकाबंदी, ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात येईल. यात गुंडगिरी, गुन्हेगारी, टवाळखोरी व असामाजिक घटकांची प्रवृत्ती ठेचून काढली जाईल, असे पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले.

Police officers and employees present on the highway for inspection during the blockade.
Dhule News : लोंबकळणाऱ्या वीज तारांचा धोका; प्रभाग अकरामधील समस्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com