Dhule News : वृक्षलागवड करा, तोड करू नका : आमदार अमरिशभाई पटेल

Dhule : तालुक्यात योग्य जागी अधिकाधिक वृक्षलागवडीवर भर द्यावा, वृक्षतोड करू नका. आम्ही हजारो, लाखो वृक्षलागवड करत ती जगविली.
Amrishbhai Patel, Abhinav Goyal, Vishal Narwade, Srikant Dhiware, Nitin Kumar Singh, Tushar Randhe, Devendra Patil, Hiraman Bhil etc. were present during the tree plantation drive.
Amrishbhai Patel, Abhinav Goyal, Vishal Narwade, Srikant Dhiware, Nitin Kumar Singh, Tushar Randhe, Devendra Patil, Hiraman Bhil etc. were present during the tree plantation drive.esakal
Updated on

Dhule News : तालुक्यात योग्य जागी अधिकाधिक वृक्षलागवडीवर भर द्यावा, वृक्षतोड करू नका. आम्ही हजारो, लाखो वृक्षलागवड करत ती जगविली. भूपेशभाई पटेल नागेश्वर, असली येथे महावृक्षारोपणातून हजारो वृक्षांची लागवड करीत आहेत. प्रत्येकाने आपापल्या गावात वृक्षलागवडीवर भर द्यावा. मनापासून वृक्षसंवर्धनाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले. (MLA Amrishbhai Patel statement on Plant trees do not cut them down )

-करवंद येथील गोरक्षनाथ मंदिर परिसरात शुक्रवारी (ता. ५) वन विभाग, मुंबईस्थित श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ, शिरपूरस्थित मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त करारातून वृक्षलागवड, संवर्धनासंबंधी कार्यक्रम झाला. आमदार पटेल यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांता धिवरे, जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी डी. सरवानंद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी अध्यक्ष तुषार रंधे.

बाजार समिती सभापती के. डी. पाटील, समाजकल्याण सभापती कैलास पावरा, प्रांताधिकारी शरद मंडलिक, पोलिस उपअधीक्षक के. के. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, गटविकास अधिकारी संजय सोनवणे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मनीषा देवेंद्र पाटील, सरपंच हिरामण भिल, मनीषा निकम, श्रीमती पी. आर. पाटील, सुभाष कुलकर्णी आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

६२ एकरांत मोहीम

आमदार पटेल म्हणाले, की ‘एसव्हीकेएम’तर्फे करवंद येथे शिरपूर तालुक्यासाठी पर्यावरणपूरक ‘ड्रीम प्रोजेक्ट’ राबवीत आहोत. करवंद येथील ६२ एकर वनक्षेत्र हिरवाईने नटणार आहे. तालुक्यातील जनतेने मुला-मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. त्यासाठी सर्व सोयी-सुविधा निर्माण केल्या आहेत, त्याचा लाभ घ्या. (latest marathi news)

Amrishbhai Patel, Abhinav Goyal, Vishal Narwade, Srikant Dhiware, Nitin Kumar Singh, Tushar Randhe, Devendra Patil, Hiraman Bhil etc. were present during the tree plantation drive.
Dhule News : गोपीनाथ मुंडे अपघात योजना अनुदान वाटपात दिरंगाई : आमदार कुणाल पाटील; तत्काळ निधीची मागणी

शिरपूर पॅटर्नद्वारे चारशे बंधारे बांधून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतोय. हजार खाटांच्या हॉस्पिटलअंतर्गत प्रथम तीनशे खाटांची सुविधा सुरू करणार आहोत. जिल्हा प्रशासनाच्या ५० लाख वृक्षलागवड मोहिमेला पुढे न्यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तालुक्यात लाभ दिला जाईल.

प्रशंसनीय कार्य

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की आमदार पटेल यांच्या प्रेरणेने करवंदला २५ हजार, नागेश्वर व असली येथे वृक्षलागवडीचे कार्य प्रशंसनीय आहे. प्रत्येकाने दोन झाडे लावत ५० लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करावे. हरित पंचायत, माझी वसुंधरा स्पर्धेत सहभागी व्हावे. उपवनसंरक्षक सिंग यांनी आमदार पटेल यांचे आभार मानले.

सीईओ नरवाडे यांनी अमरिशभाईंचे पर्यावरणपूरक कार्य सकारात्मक ऊर्जा देणारे असल्याचे सांगितले. देवेंद्र पाटील यांनी २५ हजार वृक्षलागवडीची मोहीम यशस्वी करू, असे आश्वासन दिले. मधुकर अहिरे यांनी प्रास्ताविक केले. सुभाष कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा निकम यांनी आभार मानले.

Amrishbhai Patel, Abhinav Goyal, Vishal Narwade, Srikant Dhiware, Nitin Kumar Singh, Tushar Randhe, Devendra Patil, Hiraman Bhil etc. were present during the tree plantation drive.
Dhule News : धुळ्यात बेशिस्तपणे उभ्या वाहनांना ‘जॅमर'! वाहतूक पोलिसांची कारवाई; सर्वत्र मोहीम राबविणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.