Dhule Bus Loot : लक्झरी चालकास लुटणारे दोघे अटकेत; धुळ्यातील घटना

Bus Loot : शहरातील साक्री रोडवर लक्झरी चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली.
Hrishikesh Reddy, Dheeraj Mahajan and team present during the investigation along with the suspects who robbed the luxury driver.
Hrishikesh Reddy, Dheeraj Mahajan and team present during the investigation along with the suspects who robbed the luxury driver.esakal

Dhule Bus Loot : शहरातील साक्री रोडवर लक्झरी चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुंगीकारक औषधांचा साठा व दुचाकी जप्त केली. मंगळवारी (ता.२१) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. सोमवारी (ता.२०) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास सुरतहून (गुजरात) येणाऱ्या ट्रॅव्हल्सला थांबवून चालकास चाकूचा धाक दाखवून पैसे घेत असल्याचा फोन शहर पोलिसांना प्राप्त झाला. ( Two arrested for robbing luxury driver marathi news)

त्यानुसार नितीन चौधरी, पगारे, वसंत कोकणी यांनी तत्काळ साक्री रोडवर ट्रॅव्हल्स चालकाला भेटून लूट करणाऱ्या संशयितांबाबत चौकशी केली. चालकाने १८ ते २२ वयोगटातील दोन तरुण लूटमार करत असल्याचे सांगितले. एका मुलाने डोक्यात टोपी घातली होती, तो अडखळत बोलत होता. दुसऱ्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. चाकूचा धाक दाखवून एन्ट्रीचे पाचशे रुपये दे, अशी धमकी देऊन पैसे घेऊन ते पळून गेल्याचे ट्रॅव्हल्स चालकाने सांगितले.

ही घटना ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यादरम्यान शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांना ट्रॅव्हल्स चालकाला लुटणाऱ्या दोघा संशयितांच्या क्लीप प्राप्त झाल्या. त्याची पडताळणी करून संशयित आकाश वणाजी अहिरे ऊर्फ वण्या आणि हर्शल ऊर्फ काली शांताराम कांबळे (दोघे रा. भीमनगर, साक्री रोड, धुळे) यांना पोलिसांनी अटक केली.

Hrishikesh Reddy, Dheeraj Mahajan and team present during the investigation along with the suspects who robbed the luxury driver.
Dhule Accident News : Bus- Carअपघातात पती-पत्नी जखमी; कारची Air bag उघडल्याने अनर्थ टळला

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महाजन यांनी गणेश पवार, श्याम जाधव, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, विजय शिरसाट, रवींद्र गिरासे, कुंदन पटाईत, अमोल पगारे, अमित रणमळे, प्रवीण पाटील, महेश मोरे, मनीष सोनगिरे, शाकीर शेख यांचे पथक तयार केले.

दोघे संशयित भीमनगरातील शाळा क्रमांक १४ च्या आवारात नशा करीत असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन हजार १०० रुपयांच्या मानवी मेंदूवर दुष्परिणाम करणाऱ्या औषधांच्या बारा बाटल्या, ४३ रुपयांच्या औषधी गोळ्या, एक हजार २०० रुपयांची रोकड तसेच ५५ हजारांची दुचाकी (एमएच १८ एएस ६०३३) जप्त केली.

Hrishikesh Reddy, Dheeraj Mahajan and team present during the investigation along with the suspects who robbed the luxury driver.
Dhule News: धुळेकरांसाठी E Bus; मनपासाठी ‘पेट्रोलपंप’चे स्वप्न! महासभेपुढे विषय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com