पावसाची दमदार एन्ट्री..पहिल्याच पावसात धुळेकरांची दाणादाण

वर्दळीच्या ठिकठिकाणच्या रस्त्यांवरही पाणी साचले. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणेही अवघड झाले.
पावसाची दमदार एन्ट्री..पहिल्याच पावसात धुळेकरांची दाणादाण

धुळे : शहरासह परिसरात दाखल झालेल्या मॉन्सूनने (Monsoon) बुधवारी (ता. ९) दुपारी साडेचारनंतर जोरदार सलामी दिली. मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने (Rain) धुळेकरांची त्रेधातिरपीट उडवली. पावसामुळे अनेक वर्दळीच्या मार्गांसह परिसरात पाणी साचले आहे. वीजपुरवठा (Power supply) काही काळ खंडित झाला. शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
( dhule city monsoon first rain water stagnated in many places)

पावसाची दमदार एन्ट्री..पहिल्याच पावसात धुळेकरांची दाणादाण
भयंकर घटना : वीज थेट डोक्यावर पडली; दोन जण ठार !

जिल्ह्यातील काही भागांमध्ये मॉन्सूनचे बुधवारी आगमन झाले. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मुसळधार सुरू होती. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वर्दळीच्या ठिकठिकाणच्या रस्त्यांवरही पाणी साचले. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणेही अवघड झाले. पावसाच्या हजेरीने कमलाबाई शाळेजवळ तळे साचले. त्यामुळे शाळेच्या बाहेर उभी वाहने काहीअंशी पाण्यात बुडाली. तसेच पोलिस मुख्यालयाबाहेर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक कॉलन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. मुसळधार पावसाचा कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना फटका बसला. रस्त्यावरील व्यावसायिकांना पावसासह अडचणींचा सामना करावा लागला. महापालिकेच्या काही व्यापारी संकुलाच्या तळघरांमध्ये पाणी तुंबले. पावसामुळे बडगुजर प्लॉट परिसरातील नाल्यासह शहरातील अन्य लहान नाले दुथडी भरून वाहत असल्याचे दिसले.

पावसाची दमदार एन्ट्री..पहिल्याच पावसात धुळेकरांची दाणादाण
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाने ओलांडला तीन लाखांचा टप्पा


आणखी धोकादायक स्थिती
शहरात भूमिगत गटार योजनेमुळे ठिकठिकाणी खोदकाम झालेल्या व अपूर्णावस्थेतील कामाच्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com