Dhule Crime News : जातोडे येथे घरफोडीत लाखोंचे दागिने लंपास

Dhule Crime : घरात झोपलेल्या सदस्यांना ओलांडून जात चोरट्यांनी सुमारे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नेल्याची घटना सोमवारी (ता. १८) पहाटे जातोडे (ता. शिरपूर) येथे घडली.
Broken cupboards in Rajput's house.
Broken cupboards in Rajput's house.esakal

Dhule Crime News : घरात झोपलेल्या सदस्यांना ओलांडून जात चोरट्यांनी सुमारे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने नेल्याची घटना सोमवारी (ता. १८) पहाटे जातोडे (ता. शिरपूर) येथे घडली. पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी आणखी दोन ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याचेही दिसून आले. (Dhule crime Jewellery worth lakhs stolen in house burglary at Jatode)

जातोडे गावात उमेश नानाभाऊ राजपूत यांचे घर आहे. मध्यरात्री त्यांच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. उकाडा होऊ लागल्यामुळे त्यांच्या वडिलांनी घराची दारे, खिडक्या उघडल्या. घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवून ते घरातील सदस्यांसह झोपले. पहाटे सर्व जण गाढ झोपेत होते. ही संधी साधून संशयितांनी अलगद घरात प्रवेश केला.

राजपूत यांच्या घरातील लोखंडी कपाटातून सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने काढून घेत चोरट्यांनी पोबारा केला. सकाळी जाग आल्यानंतर कपाटाकडे गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला.

Broken cupboards in Rajput's house.
Crime News: 3 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या! 14 वर्षांच्या मुलाचं धक्कादायक कृत्य..

राजपूत यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील व शोधपथक तातडीने जातोडे गावात पोचले. त्यांनी श्वानपथकालाही पाचारण केले. काही अंतरापर्यंत श्वानाने माग दाखविला. तेथून संशयित वाहनाने फरारी झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, संशयितांनी गावातील आणखी दोन घरे फोडण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांची चाहूल लागल्यामुळे पळ काढणे भाग पडल्याचे दिसून आले. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरून नमुने घेतले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

Broken cupboards in Rajput's house.
Crime News: लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या कपलची हत्या; पुरुषाच्या मुलाने तर महिलेच्या वडिलांनी मिळून केला खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com