Dhule Crime News : वरूळजवळ जुगारअड्ड्यावर छाप्यात 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

वरूळ (ता. शिरपूर) गावाजवळ गुरुवारी (ता. १५) मध्यरात्री जुगारअड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी नऊ जुगाऱ्यांकडून रोकड, मोबाईल आणि आठ दुचाकी असा चार लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
crime
crimeesakal

Dhule Crime News : वरूळ (ता. शिरपूर) गावाजवळ गुरुवारी (ता. १५) मध्यरात्री जुगारअड्ड्यावर छापा टाकून शहर पोलिसांनी नऊ जुगाऱ्यांकडून रोकड, मोबाईल आणि आठ दुचाकी असा चार लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांना संशयित प्रवीण हिंमत पाटील (रा. भटाणे, ता. शिरपूर) हा जुगारअड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. (dhule city police raided Varul gambling den and seized goods worth Rs. 4 lakh)

त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी वरूळ गावापासून अंतुर्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावठाण जागेत सुरू असलेल्या अड्ड्यावर मध्यरात्री दीडला छापा टाकला. घटनास्थळी मोबाईल टॉर्च लावून संशयित जुगार खेळत असल्याचे आढळले.

संशयित प्रवीण पाटील, भगवान सोनवणे, सतीश पाटील, आनंदा पाटोळे (चौघे रा. भटाणे), प्रदीप पवार, गणेश पारधी, नितीन परदेशी (तिघे रा. तऱ्हाडी, ता. शिरपूर), बाळू कोळी, प्रेमराज शिरसाट (दोघे रा. नवी अंतुर्ली, ता. शिरपूर) यांना अटक करण्यात आली.

crime
Sambhaji Nagar Crime : ऊसतोडणीच्या वादातून महिलेचा खून ; ब्रम्हगाव येथील घटना,पोलिसांकडून तरुणास अटक

गणेश ईशी हा संशयित पळून गेला. संशयितांकडून रोकड, मोबाईल आणि आठ दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह निरीक्षक के. के. पाटील.

शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, राजेंद्र रोकडे, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंके, आरिफ तडवी, सुशीलकुमार गांगुर्डे, सचिन वाघ, सतीश भामरे, होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी यांनी ही कामगिरी बजावली.

crime
Nashik Crime News : शांतीनगरमध्ये 3 ठिकाणी घरफोडी; 25 ते 30 तोळ्यांच्या वर सोने लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com