Dhule Crime News : साडेदहा लाखांचा अफू पळासनेरजवळ जप्त; सांगवी पोलिसांची कारवाई

Dhule Crime : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अफूच्या बोंडांची चोरटी वाहतूक करताना सांगवी येथील तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने दोघांना मुद्देमालासह पकडले.
Inspector Sriram Pawar of Sangvi Police Station, Sub-Inspector Krishna Patil, Balasaheb Wagh and colleagues along with smugglers who were caught while smuggling opium.
Inspector Sriram Pawar of Sangvi Police Station, Sub-Inspector Krishna Patil, Balasaheb Wagh and colleagues along with smugglers who were caught while smuggling opium.esakal

शिरपूर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अफूच्या बोंडांची चोरटी वाहतूक करताना सांगवी येथील तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने दोघांना मुद्देमालासह पकडले. त्यांच्याकडून ५२ किलो अफूसह ट्रक जप्त करण्यात आला असून, या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार यांना मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अफूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. (Dhule Crime Opium worth ten and a half lakh Seized near Palasner)

त्यांनी सहकाऱ्यांना नाकाबंदीचे आदेश दिले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पळासनेर (ता. शिरपूर) येथे लोकसभा निवडणुकीतील बंदोबस्तासाठी तयार केलेल्या तपासणी नाक्यावर पोलिसांनी सापळा रचला. १६ एप्रिलला रात्री सव्वाबाराला शिरपूरकडे येणाऱ्या ट्रक (आरजे ०९, जीसी ७५६९)ला पोलिसांनी संशयावरून थांबविले.

चालक, सहचालकाकडे चौकशी केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वाहनाची झडती घेतली असता ५२ किलो सुकलेली अफूची बोंडे आढळली. त्यांची बाजारातील किंमत दहा लाख ४० हजार रुपये आहे. ट्रकसह पोलिसांनी अफू जप्त केला. संशयित चालक सलामुद्दीन निजामुद्दीन (वय ४२, रा. दमाखेडी, ता. सीतामहू, जि. मंदसोर, मध्य प्रदेश).

Inspector Sriram Pawar of Sangvi Police Station, Sub-Inspector Krishna Patil, Balasaheb Wagh and colleagues along with smugglers who were caught while smuggling opium.
Dhule Fraud Crime : दलालाकडून शेतकऱ्याची फसवणूक; सौदापावती रद्द करण्यासाठी 4 लाखांची मागणी

सहचालक अशोक जगदीश चौहान (वय ३०, रा. मानंदखेडा, ता. जावरा, जि. रतलाम, मध्य प्रदेश) यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, बाळासाहेब वाघ.

सहाय्यक उपनिरीक्षक जयराज शिंदे, हवालदार संतोष पाटील, ठाकरे, प्रवीण धनगर, मोहन पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर, संजय भोई, भूषण पाटील, रणजित वळवी, इसरार फारुकी, अल्ताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली.

Inspector Sriram Pawar of Sangvi Police Station, Sub-Inspector Krishna Patil, Balasaheb Wagh and colleagues along with smugglers who were caught while smuggling opium.
Nashik Crime : सोशल मीडियावरील त्या आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल! उपनगर नाक्यावर रास्तारोको करणाऱ्या चौघांना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com