Dhule Crime News : 30 मद्यपी चालकांवर धुळ्यात दंडात्मक कारवाई; जिल्ह्यात 23 ठिकाणी नाकाबंदी

Dhule Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने २३ ठिकाणी १५ एप्रिलला रात्री ते मंगळवारी (ता. १६) पहाटेपर्यंत नाकाबंदी करून एक हजार ८२ वाहनांची तपासणी केली.
Crime
Crime esakal

Dhule Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने २३ ठिकाणी १५ एप्रिलला रात्री ते मंगळवारी (ता. १६) पहाटेपर्यंत नाकाबंदी करून एक हजार ८२ वाहनांची तपासणी केली. यात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ३० चालकांवर कारवाई केली. पोलिस दलातर्फे जिल्ह्यात १५ एप्रिलला रात्री नऊ ते रात्री मंगळवारी दुपारी एकपर्यंत २३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. (Dhule Crime action against drunken drivers)

धुळे शहर पोलिस ठाणे, आझादनगर, देवपूर, पश्चिम देवपूर, चाळीसगाव रोड, मोहाडी, धुळे तालुका, साक्री, निजामपूर, पिंपळनेर, सोनगीर, शिरपूर शहर, नरडाणा, दोंडाईचा, शिंदखेडा, थाळनेर, शिरपूर तालुका पोलिस स्टेशनसह धुळे शहर वाहतूक शाखा.

जिल्हा विशेष शाखेतील २० पोलिस अधिकारी व ८६ अंमलदारांनी ही मोहीम राबविली. धुळे शहरातील बारा पत्थर, संतोषीमाता चौक, बारापत्थर, गिंदोडिया चौक, वीर सावरकर पुतळा, वलवाडी टी पॉइंट, चाळीसगाव चौफुली, अवधान टोलनाका, शिरूड चौफुली.

Crime
Nashik Crime News : सुट्ट्यांपूर्वीच शहरात घरफोडीचे सत्र! आयुक्तालय हद्दी घरफोड्या; सव्वासात लाखांचा ऐवज चोरीला

गोल्डी चौक (साक्री), कुंडाणे चौफुली, सामोडा चौफुली, सटाणा चौफुली, सोनगीर फाटा, करवंद नाका, बेटावद चौफुली, नंदुरबार चौफुली, पाटण चौफुली, चिमठाणा चौफुली, पळासनेर आरटीओ सीमा तपासणी नाका आदी २३ ठिकाणी नाकाबंदी केली.

यादरम्यान एक हजार ८२ वाहनांची तपासणी झाली. मोटारवाहन कायद्यानुसार ३० केसस करून ६३ हजार ६०० रुपये दंड वसूल केला. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चार वाहनचालकांवर कारवाई केली.

Crime
Crime: सोसायटीच्या अध्यक्षपदावरुन काढल्याचा आला राग; दाम्पत्यावर केला जीवघेणा हल्ला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com