Dhule Crime News : सव्वादोन लाखांची चोरी 6 तासांमध्ये उघडकीस

Dhule Crime : आर्वी (ता. धुळे) येथील मंगल कार्यालयातील चोरीचा धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने केवळ सहा तासांत उलगडा केला.
Officials and employees present with jewelry in the theft case solved by Taluka Police.
Officials and employees present with jewelry in the theft case solved by Taluka Police.esakal

Dhule Crime News : आर्वी (ता. धुळे) येथील मंगल कार्यालयातील चोरीचा धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने केवळ सहा तासांत उलगडा केला. यात मालेगावमधील दोन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. तालुका पोलिसांच्या जलद कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले. आर्वी येथील पुरोहित राहुल राजेंद्र कुलकर्णी यांचा भाऊ गणेश राजेंद्र कुलकर्णी यांचा ३० मार्चला याच गावातील कन्यादान मंगल कार्यालयात विवाह होता. (Dhule crime theft of 152 lakhs was revealed in 6 hours)

राहुल यांच्या आईच्या ताब्यातील काळ्या रंगाची पर्स अज्ञात व्यक्तीने लंपास केली. पर्समध्ये एक लाख ९५ हजारांच्या तीन तोळे सोन्याच्या दोन बांगड्या, १९ हजार ५०० रुपयांचे दोन टोंगल, चारशे रुपयांचे मणी, चार हजारांची रोकड व एक हजार घड्याळ, असा एकूण दोन लाख १९ हजार ९०० रुपयांचा ऐवज होता. दुपारी अडीचच्या सुमारास ही चोरी झाली. याबाबत पुरोहित राहुल कुलकर्णी याच्या तक्रारीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अत्याधुनिक तपास तंत्र

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने तपास पथक तयार केले.

Officials and employees present with jewelry in the theft case solved by Taluka Police.
Pune Crime : शहरातील सराईत गुन्हेगारांचे ‘हॉटस्पॉट’ निश्चित; गुन्हे शाखेकडून ‘रोडमॅप’ तयार

विजय पाटील, कुणाल पानपाटील, मनोज तवर, विशाल पाटील, कुणाल शिंगाणे, धीरज सांगळे, नीलेश पाटील, राजू पावरा यांना योग्य सूचना देत तपासकामी रवाना केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आर्वी परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे पारंपरिक व अत्याधुनिक तपास तंत्राचा वापर केला.

या प्रकरणी मोहम्मद सोयब मोहम्मद सलीम (वय २६) व मोहम्मद रफिक मोहम्मद शराफतअली सिद्दिकी (वय १९, दोघे रा. पवारवाडी, मालेगाव) यांना मालेगाव येथून अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत ऐवज पोलिसांकडे दिला.

Officials and employees present with jewelry in the theft case solved by Taluka Police.
Nagpur Crime: मैत्रिणिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com