Dhule News : वीज कंत्राटी कामगार संघटनेची निदर्शने!

Dhule : राज्य वीज कंपनी कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे.
Power Company Contractual Workers Union protesting for various demands
Power Company Contractual Workers Union protesting for various demandsesakal

Dhule News : राज्य वीज कंपनी कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा बुधवारी (ता. २१) चौथा टप्पा असल्याने संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील क्युमाइन क्लबसमोर ठिय्या आंदोलनातून घोषणाबाजी केली.

आंदोलनाच्या पाचव्या टप्प्यात २८ व २९ फेब्रुवारीला कामबंद आंदोलन, तर शेवटच्या टप्प्यात ५ मार्चला मध्यरात्रीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला.(Demonstration of Electricity Contract Workers Union)

समितीने प्रमुख बारा मागण्या केल्या आहेत. त्यात एप्रिल २०२३ पासून तीन कंपन्यांमधील वीज कंत्राटी कामगारांना मागील सर्व फरकासह ३० टक्के वेतनवाढ करण्यात यावी, कंत्राटी कामगारांना मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशी लागू करून वयाच्या ६० वर्षांपर्यंत रोजगारात सुरक्षा द्यावी.

सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, सेवेत सामावून घेताना सर्व अनुभवी, कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सूट देण्यात यावी, रानडे शिफारशीनुसार विशेष आरक्षण द्यावे, तिन्ही कंपन्यांतील भरतीसाठी वयोमर्यादा समान असावी.

Power Company Contractual Workers Union protesting for various demands
Dhule Municipality News : प्लॅस्टिक व्यापाऱ्यांना 35 हजार दंड; मनपा पथकाची कारवाई

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामास समान वेतन देण्यात यावे, कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या चार लाखांच्या आर्थिक मदतीत वाढ करून ती १५ लाख करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

आंदोलनात महेंद्र सोनवणे, प्रशांत माळी, राजेंद्र रामोळे, रोहित महाजन, राजेंद्र राजपूत, कैलास चित्ते, मोहन कानडे, प्रवीण ठाकूर, सचिन जाधव, दिलदार माळी आदी सहभागी झाले.

Power Company Contractual Workers Union protesting for various demands
Dhule News : धुळ्यात 5 दिवस महासंस्कृती महोत्सव : 26 फेब्रुवारीला उद्‍घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com