Dhule Municipal Corporation latest marathi news
Dhule Municipal Corporation latest marathi newsesakal

नव्या सरकारकडून धुळे विकासाला गती

धुळे : राज्यात भाजपच्या पुढाकाराने परिवर्तनातून शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा धुळे शहराच्या पदरात विकासाचे दान म्हणून आणखी एक पाणीपुरवठा योजना आणि भुयारी गटार (ड्रेनेज) योजना मंजूर केली आहे.

यात महिन्याभरात सरकारने महापालिकेकडून ‘डीपीआर’ मागविला आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट गावांना पाणीपुरवठा योजनेतून दिलासा, तर देवपूर वगळून उर्वरित धुळे शहराला ड्रेनेज योजनेचा लाभ मिळणार आहे. (Dhule development accelerated by new eknath shinde government dhule Latest Marathi News)

खासदार डॉ. सुभाष भामरे आणि भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश लाभल्याने या योजना महापालिकेच्या पदरात पडल्या आहेत. त्यामुळे शहर विकासाला गती आणखी गती लाभू शकेल.

शहराचा पाणीप्रश्‍न निकाली काढू शकेल, अशी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना पूर्वी भाजपप्रणीत राज्य सरकारनेच मंजूर केली होती. तसेच विकसनशील देवपूरसाठी दीडशे कोटींच्या निधीतून भुयारी गटार योजनाही याच सरकारच्या काळात अमलात आली होती.

यापाठोपाठ हद्दवाढीतील अंशतः नगावसह ११ गावांची तहान भागू शकेल, अशी महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना नव्या सरकारने मंजूर केली आहे. या योजनेचा अंशतः नगाव, वलवाडी, भोकर, महिंदळे, नकाणे, मोराणे, चितोड, अवधान, वरखेडे, बाळापूर, पिंप्री क्षेत्राला लाभ मिळू शकेल. महापालिका हद्दवाढीच्या क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी ठरली आहे.

Dhule Municipal Corporation latest marathi news
World Breastfeeding Week 2022 : आईच्या दुधामुळे बाळ हुशार, निरोगी

ड्रेनेज योजनेचा लाभ

येथील तत्कालीन नगरपालिका आणि विद्यमान महापालिका क्षेत्रात ड्रेनेज लाईन नसल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सांडपाणी आणि मलःनिस्सारणाची सुविधा नसल्याने आरोग्याचे प्रश्‍नही बिकट झाले.

असे असताना शहरात विकसनशील देवपूर भागात सुमारे दीडशे कोटींच्या निधीतून भुयारी गटार अर्थात ड्रेनेज लाईन योजना मंजूर झाली. ती निधीच्या कारणास्तव रखडली तरी तिला आता गती देण्यासाठी महापौर कर्पे आणि भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी नुकतेच प्रयत्न सुरू केले आहेत.

असे असताना देवपूर भाग वगळून उर्वरित धुळे शहरासाठी नव्या सरकारने ड्रेनेज लाईनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे उर्वरित धुळे शहरातील सांडपाणी आणि मलःनिस्सारणाचा प्रश्‍न निकाली निघण्यास मदत होणार आहे.

योजनांचा असा लाभ

शहरातील ज्या भागात पाणीपुरवठ्याची समस्या आहे, त्या भागातील वितरण वाहिनी टाकणे, सद्यःस्थितीतील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था दीर्घकालीन असल्याने, जीर्ण झाल्याने आवश्यक त्या ठिकाणी नूतनीकरण करणे, शहरातील हद्दवाढ भागाचा विचार करून त्या ठिकाणी नवीन जलकुंभांची निर्मिती व वितरण व्यवस्था निर्माण करणे, नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आणि त्यांचे नूतनीकरण करणे, पाणीपुरवठा व्यवस्था अत्याधुनिक करणे यासाठी शासनामार्फत मान्यता प्राप्त झाली आहे.

यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे- शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून या दोन योजनांना मान्यता मिळाली आहे.

"राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाल्यावर शहराच्या विकासाला गती मिळू लागली आहे. ही भेट शहर विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. धुळे शहराच्या सर्वांगिण विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. त्यास धुळेकरांची साथ लाभावी."

- अनुप अग्रवाल, शहर- जिल्हाध्यक्ष, भाजप

Dhule Municipal Corporation latest marathi news
Dhule : राजाराम महाराजांची १२५ वी जयंती साजरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com