Agriculture Department : बियाणे, खते पुरेसे; जादा दराने खरेदी करू नका! कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Dhule News : शेतकऱ्यांनी जादा दराने बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे.
seeds
seeds esakal

Dhule News : येत्या खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या एकूण २७ हजार २४५ क्विंटल बियाण्याची जिल्ह्यासाठी मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी आजअखेर १९ हजार ५३३ क्विंटल बियाणे पुरवठा झाला असून उर्वरित बियाणाचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जादा दराने बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ यांनी केले आहे. (Don't buy seeds and fertilizers at high prices Agriculture Department appeal to farmers)

खरीप हंगाम-२०२४ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन लाख ७९ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी मुख्य पीक कापूस, मका, बाजरी, ज्वारी इत्यादी आहेत. कापूस पिकाची साधारण दोन लाख १९ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल, असा अंदाज आहे. त्या खालोखाल मका ६७ हजार ७२७ हेक्टर तर बाजरी पिकाचे क्षेत्र ३८ हजार १६० हेक्टर इतके आहे.

खरीप हंगामासाठी विविध पिकांच्या एकूण २७ हजार २४५ क्विंटल बियाण्याची मागणी केली आहे. त्यापैकी १९ हजार ५३३ क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे. उर्वरित बियाण्याचा पुरवठा सुरू आहे. तसेच बीटी कापूस पिकाचे दहा लाख ९९ हजार ४०० बियाणे पाकिटांची मागणी केली होती. बियाणे कंपन्यांनी दिलेल्या नियोजनांपैकी आठ लाख ४२ हजार ८९२ बियाणे पाकिटे जिल्ह्यात पुरवठा झाली आहेत.

तसेच उर्वरित बियाणे पाकिटाचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे जिल्हाभर पुरेसे बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांना बळी पडून जादा दराने बियाणे खरेदी करू नये. बियाणे खरेदी करताना अधिकृत वितरकाकडून पक्क्या बिलावर बियाणे खरेदी करावे. शेतकरी बांधवांनी कापूस बियाणे खरेदी करताना ठराविक वाणांचा आग्रह धरू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (latest marathi news)

seeds
Dhule Lok Sabha Constituency : निकालाबाबत उत्सुकता शिगेला; आकडेमोड सुरुच

खतांचा साठाही पुरेसा

जिल्ह्यात खतांचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी एकूण एक लाख ३३ हजार ६०० मेट्रिक टन खतांची मागणी केली. त्यापैकी एक लाख पाच हजार ८०० मेट्रिक टन खताचे जिल्ह्यास आवंटन मंजूर झाले आहे. आजअखेर जिल्ह्यात मागील उपलब्ध साठा व एप्रिल, मेमध्ये प्राप्त साठा मिळून एकूण ५२ हजार १९४ मेट्रिक टन एवढा पुरेसा खतसाठा वितरकांकडे उपलब्ध आहे.

महिनानिहाय मंजूर आवंटनाप्रमाणे उर्वरित खतांचा पुरवठा होणार आहे. तसेच बफरसाठी युरिया चार हजार ७९० मेट्रिक टन, डीएपी २८० मेट्रिक टनचे लक्षांक आहे. आजअखेर युरियाचा २१९२.२३ मेट्रिक टन व डीएपीचा ७३ मेट्रिक टन बफर साठा झाला आहे.

तपासणीसाठी पथके

जिल्हास्तरावर एक भरारी पथक व तालुका स्तरावरील चार असे एकूण पाच भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत असून या पथकांकडून निविष्ठा केंद्राची अचानक तपासणीची कार्यवाही सुरू आहे. तपासणीनंतर निविष्ठा केंद्र चालकांनी त्रुटी पूर्तता न केल्यास परवानावर कार्यवाहीसाठी प्रस्ताव परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर होईल.

seeds
Dhule District Collector : मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्रीची दुकाने बंद! जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचा आदेश

संबंधितांवर कारवाई

कृषी विभागामार्फत प्रतिबंधित कापूस एचटीबीटी बियाणे विक्रीबाबत दोन व जादा दराने कापूस बियाणे विक्रीबाबत दोन पोलिस केसेस केल्या आहेत. तसेच खत नियंत्रण आदेशाच्या उल्लंघनप्रकरणी एका वितरकावर गुन्हा दाखल केला आहे.

अडचण असल्यास संपर्क साधा

शेतकऱ्यांनी कुठल्याही गैरसमजुतीला बळी न पडता प्रतिबंधित एचटीबीटी कापूस पिकाचे बियाणे खरेदी करू नये. तसेच जादा दरानेही बियाणे खरेदी करू नये. बियाणे, खते व कीटकनाशकांबाबत काही अडचण असल्यास गुणनियंत्रण कक्ष (दूरध्वनी-०२५६२-२३८१८७), जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (मो.- ८२७५६३९४६८).

मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, धुळे (मो-९४०३४१५६७५) वा नजीकच्या कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास शिरसाठ व जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांनी केले आहे.

seeds
Dhule Seed News : कापूस बियाणे सर्रास जादा दराने विक्री; आमदार रावलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com