Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : जयजयकारासह धुळ्यातील वातावरण 'भीममय'

Dhule News : राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत.
Young women participating in the Ambedkar Jayanti procession on Saturday.
Young women participating in the Ambedkar Jayanti procession on Saturday. esakal

Dhule News : राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात रक्तदान शिबिर, भीमगीत गायन, मिरवणूक आदींचा समावेश असेल. या पार्श्‍वभूमीवर प्रथमच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ६० बाय ४० फूट आकाराची प्रतिमा रांगोळीद्वारे साकारण्यात येईल. (Dhule Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary)

जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. १३) शहरातून निळ्या फेटेधारी तरूणींसह महिलांची निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली. शिवाय डॉ. आंबेडकरांच्या जयजयकारासह विविध उपक्रमांमुळे ‘भीममय’ वातावरण झाले. शहरातील बसस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासह साक्री रोड, शहरातील अन्य भागात, आंबेडकरी अनुयायांच्या निवासस्थानांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बसस्थानकाजवळील पुतळ्याजवळ रविवारी मुख्य कार्यक्रम होणार आहे. या ठिकाणी दरवर्षी रक्तदान शिबिर, सरबत वाटप, भीमगीत गायन व शाहिरी जलसा आदी कार्यक्रम विविध संघटनांकडून होतात. त्यानुसार यंदाही कार्यक्रमांचे नियोजन आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.

आकर्षक सजावट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आकर्षक सजावट करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त शनिवारी पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी मोठी झाली. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा, विविध भाव मुद्रा, अर्धाकृती पुतळे, निळे ध्वज, टोप्या, चष्मे, फेटे, तसेच अन्य साहित्य खरेदीसाठी आंबेडकरीप्रेमींसह अनुयायांनी गर्दी केल्याचे दिसून आले. (latest marathi news)

Young women participating in the Ambedkar Jayanti procession on Saturday.
Dhule News : वकवाड येथील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर; चर्चपाठोपाठ प्रधान भवनाची जागा हडपण्याचा प्रयत्न

शहरातील आग्रा रोड, फुलवाला चौक, साक्री रोड, पारोळा रोड, देवपूर आदी परिसरात अनुयायींनी विविध साहित्य, कपडे खरेदीवर भर दिला. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ गर्दीने फुलली होती. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांची मोठी उलाढाल झाली.

महिलांची लक्षवेधी शोभायात्रा

आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी सायंकाळी पाचला शहरातील शिवतीर्थ येथून महिला- युवतींतर्फे शोभायात्रा निघाली. भीमनगर, साक्री रोड, नकाणे रोड, वाडीभोकर रोड, नेहरू चौक मार्गे आग्रा रोडवरून बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ शोभायात्रेचा समारोप झाला. यात निळे फेटे परिधान केलेल्या महिला- युवतींनी लक्ष वेधले. नयना दामोदर, सरोज कदम, चंदा साळवे.

शोभा बैसाणे, माया पानपाटील, सरला निकम, कल्पना सामुद्रे, पूनम शिरसाट, पुष्पा शिरसाट, कल्पना खरात, रेखा वाणखेडकर, सुनीता शिरसाट, सुनीता वाघ, तेजश्री मोरे, वंदना केदारे, वंदना बागुल, रंजना इंगळे, विद्या खरात, शारदा म्हस्के, अरुणा मोरे, ज्योती देवरे, सपना शिरसाट, सविता नागमल आदी सहभागी झाले.

Young women participating in the Ambedkar Jayanti procession on Saturday.
Dhule News : शिंदखेड्यात फक्त 921 हेक्टरवरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com