Dhule News : धुळ्यातील अतिक्रमणे हटवा; वाहतुकीची कोंडीही सोडवा..! खासदार डॉ. बच्छाव

Dhule : धुळ्यातील वाढती अतिक्रमणे, वाहतुकीच्या कोडींसह नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा प्रश्‍न हाताळत अधिकारी वर्गाला योग्य कार्यवाहीबाबत सूचना केल्या.
Abhinav Goyal, Dr. attended the meeting at the Collector's office. Shobha Bachhav, Vishal Narwade, Kunal Patil, Nitin Gawande, Bhushan Kote etc.
Abhinav Goyal, Dr. attended the meeting at the Collector's office. Shobha Bachhav, Vishal Narwade, Kunal Patil, Nitin Gawande, Bhushan Kote etc.esakal

Dhule News : शहरासह जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्‍नांना, या अनुषंगाने जनभावनांना प्रथमच जिल्हास्तरीय शासकीय बैठकीत काँग्रेसच्या नवनिर्वाचीत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी स्पर्श केला. त्यांनी धुळ्यातील वाढती अतिक्रमणे, वाहतुकीच्या कोडींसह नित्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा प्रश्‍न हाताळत अधिकारी वर्गाला योग्य कार्यवाहीबाबत सूचना केल्या. या प्रश्‍नांचा निपटारा करताना खासदार बच्छाव यांनी जिल्ह्यातील निरनिराळ्या प्रश्‍नांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत उपाययोजना, जनहिताचे निर्णय घेण्यासंदर्भात सूचीत केले. (Remove encroachments in city and solve traffic problems )

शासकीय बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल अध्यक्षस्थानी होते. खासदार डॉ. बच्छाव, जिल्हा परिषदेचे सीईओ, महापालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर, प्रदेश सदस्य युवराज करनकाळ, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी सरवानंद डी., निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात पवार, प्रांताधिकारी राहुल जाधव, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, सुलवाडे- जामफळ सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता अमरदीप पाटील, सार्वजनिक बाधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस अधिकारी भूषण कोते व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (latest marathi news)

Abhinav Goyal, Dr. attended the meeting at the Collector's office. Shobha Bachhav, Vishal Narwade, Kunal Patil, Nitin Gawande, Bhushan Kote etc.
Dhule News : 2 दिवसांत 739 हरकतींवर सुनावणी; मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया

धुळे शहराचे प्रश्‍न

धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा व उपाययोजनेसाठी खासदार डॉ. बच्छाव यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. अधिकारी वर्गाला उद्देशून त्या म्हणाल्या, की यंदा चांगले पर्जन्यमान झाल्यास धुळे शहराला नियमित पाणीपाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे. शहराला आठ दिवसांनी होणारा पाणीपुरवठा रोज व नियमिततेसाठी प्रभावी उपाय योजावे. महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने करावी. खड्डेमुक्त शहर करावे. रस्त्यांच्या कामात गुणवत्ता राखावी.

शहरातील अतिक्रमण काढण्यात यावे. त्यातून वाहतुकीची कोंडी सोडवावी. स्वच्छ धुळ्यासाठी घंटागाडी सेवा नियमित दिली जावी. सफाई कामगारांची भरती करावी. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. भूमिगत गटार योजनेचे काम लवकर पूर्ण करावे. पांझरा नदी स्वच्छतेसह किनारी घाटाचे नूतनीकरण करावे. उद्योग वाढीसह रोजगारनिर्मितीसाठी एमआयडीसीचे विस्तारीकरण गरजेचे असून या वसाहतीअंतर्गत विविध अडचणी सोडवाव्यात.

Abhinav Goyal, Dr. attended the meeting at the Collector's office. Shobha Bachhav, Vishal Narwade, Kunal Patil, Nitin Gawande, Bhushan Kote etc.
Dhule News : 111 ग्रामपंचायत इमारतींसाठी 24 कोटी 75 लाख निधी मंजूर; जिल्ह्यातील ग्रामपंचायती

जिल्ह्यात समस्या सोडवा

राष्ट्रीय महामार्गांवरील अतिक्रमण काढण्यात यावे. सिंचन योजनांवर अधिक भर द्यावा. सुलवाडे- जामफळ कनोली उपसा सिंचन योजना वेळेत पूर्ण करावी. मुंबई- दिल्ली इंडस्ट्रियल कॉरीडॉर प्रकल्पासाठी प्रशासकीय पातळीवरूनही पाठपुरावा करावा. नरडाणा एमआयडीसीसंबंधी प्रश्‍न मार्गी लावावे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात.

नवीन रस्ते, आदिवासी वस्ती, दलित वस्ती विकास योजना प्रभावी राबविणे, अल्पसंख्यांक समाजाच्या अडीअडचणी, शैक्षणिक प्रश्‍न सोडवावे. नियमित आढावा घेत इंदूर- मनमाड रेल्वेसंदर्भात अद्ययावत माहिती द्यावी. यात बोरविहीर ते नरडाणा रेल्वे मार्गावरील जमिन अधिग्रहण व त्यातील धुळे व शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्यासाठी उपाययोजना करणे.

मोबदला, पाटचारी प्रश्‍न

शिंदखेडा तालुक्यातील गोराणे, माळीच गावासंबंधी एमआयडीसी जमिनीचे मोबदला दर निश्चित करणे, अक्कलपाडा धरणातून नाल्यात पाणी सोडणे, विखरण धरणात पाणी उपलब्ध होण्याबाबत उपाययोजना करणे, पिक विमा योजना, वाडी- शेवाडी धरण व उजवा कालव्यासंबंधी निम्म्या धरणापर्यंत पाटचारी वाढविण्यावर चर्चा झाली. धुळे शहर व जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देऊन ते लवकर पूर्ण करावे, अशी सूचना खासदार डॉ. बच्छाव यांना दिली. जिल्हाधिकारी गोयल यांच्यासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली.

Abhinav Goyal, Dr. attended the meeting at the Collector's office. Shobha Bachhav, Vishal Narwade, Kunal Patil, Nitin Gawande, Bhushan Kote etc.
Dhule News : पूल अन् रस्त्यांची कामे फलकांविनाच सुरू! वाहनधारकांना त्रास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com