Dhule News : लग्नसराईत गुरूसह टोमॅटोच्या भावाचाही अस्त

Dhule : खानदेशात एकोणतीस नोव्हेंबरपासून लग्नसराईची मोठी धामधूम सुरू होती. मात्र गुरूच्या अस्तामुळे लग्नसराई मंदावली आहे.
Ashok Mali has rejuvenated the tomato plantation in low water
Ashok Mali has rejuvenated the tomato plantation in low water.esakal

Dhule News : खानदेशात एकोणतीस नोव्हेंबरपासून लग्नसराईची मोठी धामधूम सुरू होती. मात्र गुरूच्या अस्तामुळे लग्नसराई मंदावली आहे. लग्नसराईमुळे भाव खाणाऱ्या टोमॅटोचे दर प्रतिकिलो दहा-बारा रुपयांवर आले आहेत. गुरूच्या अस्ताबरोबर टोमॅटो दराचाही अस्त झाल्याचे बोलले जात आहे. इतर भाजीपाल्याचे दरही आवाक्यातच आहेत. ( price of tomato is increase ten twelve rupees per kg )

खानदेशात आषाढी एकादशीपासून लग्नसराईची मोठी धामधूम सुरू होती. गुरूच्या अस्तामुळे विवाहेच्छूंचा हिरमोड झाला आहे. ३ जूनपासून पुन्हा विवाहाची धामधूम सुरू होईल. मेच्या कडाकाच्या उन्हात बऱ्याच जणांना दिलासाही मिळाला आहे. विवाहाशी निगडित व्यवसाय मंदीचे सावट दिसत आहे.

टोमॅटोची लाली काळवंडली

लग्नसराईत टोमॅटोला मोठी मोगणी असते. टोमॅटो आधीच कमी भावात विकला जात होता. तो आणखी घसरला आहे. अवघ्या दहा-बारा रुपयांनी विकला जातोय. दुष्काळात कमी पाण्यात जगविलेल्या टोमॅटोची लाली भावाअभावी खूपच कमी झाल्याचे उत्पादक अशोक माळी यांनी सांगितले. (latest marathi news )

Ashok Mali has rejuvenated the tomato plantation in low water
Dhule News : विमान पाठवून कदमबांडे यांना बोलावले; शाहू महाराजांचे वारस; मोदींच्या कोल्हापूरमधील सभेस उपस्थित

शुभकार्ये थांबतील

१ मेपासून गुरूचा वृषभ राशीत प्रवेश झाला. ६ मेपासून २८ दिवसांसाठी गुरूचा अस्त झाला. ज्योतिषीय गणनेनुसार गुरूचा २ जूनपर्यंत वृषभ राशीत अस्त आहे. या काळात मंगळ आणि राहूसुद्धा गुरूच्या मीन राशीत संक्रमण करतील. अशा स्थितीत मीन आणि धनू राशीच्या लोकांना मंगळ आणि राहूच्या प्रतिकूल प्रभावातून जावे लागू शकते. गुरू ग्रह अस्तामुळे विवाह विधीसारखी शुभकार्ये होऊ शकणार नाहीत.

बरे झाले गुरूचा अस्त झाला

गुरूच्या अस्तामुळे लग्नसराईवर मोठा परिणाम झालाय. बाजारपेठ मंदावेल. व्यापाऱ्यांसह छोट्या व्यावसायिकांनाही याचा फटका बसणार आहे. मात्र बेचाळिशी पार केलेल्या तापमानात विवाहासाठी पळापळ करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेच्या सुटीतील निवांतपणा अनुभवता येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्यांनी बरे झाले गुरूचा अस्त झाला, असे समाधानाने म्हटले आहे.

Ashok Mali has rejuvenated the tomato plantation in low water
Dhule News : प्रत्येक घंटागाडीला 4 ट्रिपचे बंधन; 1 मेपासून कार्यवाही सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com