Dhule Fire Accident News : शॉर्टसर्किटच्या आगीत कांदाचाळ, चारा खाक

Dhule Fire Accident : वर्षा अनिल मराठे यांच्या शेतात वीजतारा तुटून झालेल्या शॉर्टसर्किटने त्यांच्या शेतातील मक्याचा कडबा (चारा) व कांदाचाळ जळून पूर्णपणे खाक झाली.
Varsha Marathe's onion field in Bhadne Shiwar along the Pimpalner road was burnt in the fire.
Varsha Marathe's onion field in Bhadne Shiwar along the Pimpalner road was burnt in the fire.esakal

Dhule Fire Accident News : साक्री-पिंपळनेर रस्त्यालगत भाडणे शिवारातील हॉटेल साई सेवाशेजारी असणाऱ्या वर्षा अनिल मराठे यांच्या शेतात वीजतारा तुटून झालेल्या शॉर्टसर्किटने त्यांच्या शेतातील मक्याचा कडबा (चारा) व कांदाचाळ जळून पूर्णपणे खाक झाली. यात लाखोंचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नाही. याबाबत वर्षा मराठे यांनी तक्रार दाखल केली आहे. (Dhule Fire Accident Onion storage destroyed in short circuit fire)

साक्री-पिंपळनेर रस्त्यालगत भाडणे शिवारात वर्षा मराठे यांचे शेत आहे. शेतात मजुरांना राहण्यासाठी घर असून, यालगतच मक्याचा कडबा (चारा) ठेवलेला होता. चाऱ्यालगत कांदा साठवणुकीसाठीची कांदाचाळदेखील उभारलेली होती. या शेतात बांधालगत वीज वितरण कंपनीची उच्च दाबवाहिनी संच मांडणीदेखील केली आहे.

याच संचातून गेलेली एक तार तुटून त्यातून ठिणग्या पडल्याने शेतातील मक्याच्या चाऱ्यास आग लागली. या आगीची माहिती शेतातील मजुराने वर्षा मराठे यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांचे दीर हृषीकेश मराठे यांना याबाबत माहिती देत घटनास्थळी पोचण्याची विनंती केली. (latest marathi news)

Varsha Marathe's onion field in Bhadne Shiwar along the Pimpalner road was burnt in the fire.
Dhule News : सुधारित संचमान्यतेचा निर्णय रद्द करा; धुळे जिल्हा शिक्षकभारती

श्री. मराठे यांनीदेखील तातडीने नगरपंचायतीच्या अग्निशामक दलास याबाबत माहिती देत ते घटनास्थळी पोचले. घटनास्थळी वाऱ्यामुळे आग वेगात पसरली व त्या ठिकाणच्या चाऱ्यासोबत शेजारील कांदाचाळीनेदेखील पेट घेतला.

यात मक्याचा कडबा चारा व कांदाचाळ पूर्णपणे खाक झाली. यात लाखोंचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने जीवितहानी मात्र झाली नाही. वीज तारा तुटून ठिणग्या पडूनच आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

यानंतर हृषीकेश मराठे यांनी याबाबत महावितरण विभागास कळविले व तेदेखील घटनास्थळी येऊन त्यांनी त्यांची कार्यवाही सुरू केली. याबाबत शेतमालक मराठे यांनी महावितरण विभागाकडे अर्ज देत तक्रार दाखल केली आहे.

Varsha Marathe's onion field in Bhadne Shiwar along the Pimpalner road was burnt in the fire.
Dhule Lok Sabha Code Of Conduct : आचारसंहितेचे उल्लंघन..! ‘सी-व्हिजिल’वर तक्रार करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com