Channi - Narendra Narayanarao Satpute of Yaval carving a name on a pot with a hammer.
Channi - Narendra Narayanarao Satpute of Yaval carving a name on a pot with a hammer.esakal

Dhule News : दुष्काळामुळे यात्रोत्सवातील हस्तकला व्यवसायही संकटात; नाव कोरणाऱ्या कारागिरांना फटका

Dhule : आधुनिकतेच्या नावाखाली कितीही बदल झाला असला तरी अजूनही पारंपरिक हस्तकला आपले अस्तित्व टिकवून आहेत.

Dhule News : आधुनिकतेच्या नावाखाली कितीही बदल झाला असला तरी अजूनही पारंपरिक हस्तकला आपले अस्तित्व टिकवून आहेत. ग्रामीण भागात यात्रांमध्ये छन्नी-हातोडीने कसबी कारागिर आजही भांड्यावर नाव कोरण्यासाठी धडपड करताना दिसतात. येथील आदिमाया धनदाईदेवीच्या यात्रेत यावल येथील ज्येष्ठ कसबी कारागिर नरेंद्र नारायणराव सातपुते गल्लोगल्ली फिरत भांड्यावर नाव टाकत वितभर पोटाच्या खळगीसाठी धडपड करत आहे. (Dhule Handicraft business in Yatra Festival is also in crisis due to drought marathi news)

हंगामाप्रमाणे (सिझन) विविध व्यवसाय करणारे सातपुते उतार वयातही कामात ‘राम’ शोधत आहेत. यंदा दुष्काळाचा परिणाम भांडी विक्री व नाव कोरणाऱ्या कारागिरांना बसला आहे. आजही खानदेशातील प्रत्येक यात्रांमध्ये भांड्यांच्या दुकानात छन्नी व हातोडीने पितळी आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांवर नावं कोरली जातात. दुकानाबाहेर पोत्यावर बसलेला कारागिर त्याला सांगितलेले नाव हातोडीने एका विशिष्ट शैलीत आणि हलके हलके प्रहार करून भांड्यांवर टाकत असतो.

फावल्या वेळेत सातपुते गावात फेरी मारत नाव टाकून देत आहेत. गावात छन्नी-हातोडी घेऊन कसबी कारागिर दारावर येत ‘भांड्यावर नाव घालून देणार...’ अशी हाक देतात. पूर्वी लग्नात भांडी देण्याची पद्धत अस्तित्वात होती. ती आज काही भागात आहेही. त्यावर नववधूचे नाव टाकले जाते. यंदा दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे असे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. (latest marathi news)

Channi - Narendra Narayanarao Satpute of Yaval carving a name on a pot with a hammer.
Dhule News : आदिमाया धनदाईदेवीचा उद्यापासून यात्रोत्सव! मध्य प्रदेश, गुजरातमधून भाविक हजेरी लावणार

अलिकडे एन्ग्रेव्हिंग मशिनचे अतिक्रमण...

कालांतराने नावे टाकण्याची आधुनिक यंत्रे आली. स्वतः दुकानदारच भांड्यांवर नाव टाकू लागला. विजेवर चालणारे ‘एन्ग्रेव्हिंग मशिन’ हे त्या यंत्राचे नाव. मराठीत त्याला ‘कोरणी’ असेही म्हणतात. कोरणी यंत्रामुळे छन्नी - हातोडीने नाव कोरणाऱ्या कसबी कारागिरांवर गदा आली. आजही हे यंत्र भांड्यांच्या दुकानात हमखास दिसून येते. हे मशीन हातात घेतल्यावर होणारा ‘ट्रार्रर्रर्रर्रर्र… ट्रार्रर्रर्रर्र...’ असा आवाज, त्या क्षणाची थरथर आणि यंत्राचे टोक भांड्यावर टेकवल्यावरचा अनुभव अगदीच मजेशीर आणि कुतुहलयुक्त असतो.

आता भांडी राहिली गरजेपुरती

सध्याच्या काळात तांब्या, पितळाच्या भांड्यांचाही गरजेपुरताच वापर होतो. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून प्राचीन काळापासून वापरात असलेली तांबा व पितळीची भांडी अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसून येते. स्वयंपाक घरात या भांड्यांची जागा आता स्टेनलेस स्टील व फायबरच्या भांड्यांनी घेतली आहे.

आकर्षक आणि शोभेच्या वस्तूंनी स्वयंपाक घरातील जागा काबीज केली आहे. कालांतराने हस्तकलेवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना रोजगार शोधण्याची वेळ येणार आहे. म्हणून श्री. सातपुते रक्षाबंधनाला राख्या, गणेश उत्सवात सजावट, होळीला हार - कंगण, पोळ्याला बैल सजावटीचे साहित्य तर जानेवारी महिन्यात नवीन वर्षाचे कालनिर्णय विक्री करत आपल्या पोटाची आग शमवतात.

Channi - Narendra Narayanarao Satpute of Yaval carving a name on a pot with a hammer.
Dhule News : ‘एलसीबी’ची प्रतिमा स्वच्छ करण्याची गरज; कायदा- सुव्यवस्थेसंबंधी कारभारात बाह्य हस्तक्षेपामुळे चिंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com