Tribal laborers harvesting irrigated wheat. In the second photo, gram harvesting is in progress.
Tribal laborers harvesting irrigated wheat. In the second photo, gram harvesting is in progress.esakal

Dhule News : बागायती गव्हासह हरभरा काढण्याची लगबग; दुष्काळात ठिबकने फुलविला रब्बी हंगाम

Dhule : बागायतदार शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनाचा खुबीने वापर करून गहू व हरभरा चांगल्या पद्धतीने फुलविला.

Dhule News : या वर्षी दुष्काळी स्थिती आहे. उत्तरार्धाचा पाऊसही झाला नाही. रब्बी हंगामाच्या आशाही मावळल्या. मात्र बागायतदार शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनाचा खुबीने वापर करून गहू व हरभरा चांगल्या पद्धतीने फुलविला.

सध्या बागायती गहू व हरभरा काढण्याची लगबग सुरू आहे. या वर्षी हार्वेस्टरपेक्षा कापणीने गहू व हरभरा काढण्याकडे कल आहे. यामुळे चारा उपलब्ध होण्यास मदत होत आहे. (Dhule harvesting of horticultural wheat and gram)

Tribal laborers harvesting irrigated wheat. In the second photo, gram harvesting is in progress.
Dhule News : रस्ता काँक्रिटीकरणासाठी 424 कोटी; शिरपूर तालुक्याला लाभ

धुळे तालुक्यात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. दिवाळीपासूनच विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली होती. बागायती हंगामावर मोठा परिणाम झाला. शेतकऱ्यांनी विहिरी व कूपनलिकांच्या संभाव्य पाणीपातळीचा विचार करून बागायती हंगाम आटोपता घेतला. गव्हापेक्षा हरभऱ्याची पेरणी अधिक केली.

बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचनाने गहू व हरभरा फुलविला. सध्या गहू व हरभऱ्याच्या काढणीस वेग दिला आहे. हार्वेस्टरऐवजी कापणी व थ्रेशरने काढणी व मळणी सुरू आहे.

यामुळे चाऱ्याची उपलब्धता होत आहे. उन्हाळ्याच्या येत्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाण्यासह चाराटंचाई जाणवणार आहे. यामुळे शेतकरी चाऱ्याचे नियोजन करीत आहेत. (latest marathi news)

Tribal laborers harvesting irrigated wheat. In the second photo, gram harvesting is in progress.
Dhule News : बांधकाम कामगारांना तालुकानिहाय भांडीवाटप : आमदार कुणाल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com