Dhule News : महागड्या किमतीची लोकर कवडीमोल; मागणीअभावी शेतकिनाऱ्याला फेकून देण्याची वेळ

Dhule News : धुळे जिल्ह्यातील शेकडो मेंढपाळ लाखो मेंढ्यांचे पालन करून उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र पूर्वी मेंढ्यांचे केस लोकर विक्री मोठ्या प्रमाणात होत असे.
Wool
Wool esakal

सोनगीर : धुळे जिल्ह्यातील शेकडो मेंढपाळ लाखो मेंढ्यांचे पालन करून उदरनिर्वाह चालवत आहेत. मात्र पूर्वी मेंढ्यांचे केस लोकर विक्री मोठ्या प्रमाणात होत असे. अशा लोकर विक्रीतून हजारो रुपयांची उलाढाल व्हायची. येथील लोकर थेट हरियानातील पानिपत येथे विक्रीसाठी नेली जायची. पण लोकरीपासून तयार होणाऱ्या घोंगडी, रग, कांबळाला मागणी नसल्याने लोकर विक्री ठप्प झाली आहे. (Dhule lack of demand for high priced wool)

महागड्या किमतीचे लोकर कवडीमोलही घेतले जात नसल्याने जागा मिळेल तेथे किंवा शेतकिनाऱ्याला फेकून दिले जात आहे. घोंगडी, रग व कांबळ तयार करण्याच्या लघुउद्योगासाठी राज्यभर प्रसिद्ध असलेले सोनगीर, निजामपूर-जैताणे व काही गावांत आजही मोठ्या प्रमाणात मेंढपाळ आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी धनगर समाजात घरोघरी चरख्यावर लोकरीपासून घोंगडी, रग, कांबळ तयार करण्याचा व्यवसाय होता.

धनगर समाजाची शेकडो कुटुंबे या व्यवसायात होती असे आजच्या पिढीला खरेही वाटणार नाही. आता एकही कारागीर राहिला नाही. परिसरात दीडशेहून अधिक मेंढ्यापालक ठेलारी कुटुंबे आहेत. मेंढ्यांची लोकर तीस रुपये किलो मिळायची. मात्र ती ग्राहकाला स्वत: कापून घ्यावी लागायची. त्यासाठी रानोरान भटकावे लागे.

कापून आणलेली लोकर साफ करून चरख्यावर सूत काढले जायचे. त्याला धुतल्यावर चिंचेची कोळ लावून मागावर विणले जाई. विणून तयार झालेली घोंगडी पुन्हा धुऊन स्वच्छ करून विक्रीसाठी उपलब्ध होई. तयार माल घेण्यासाठी व्यापारी यायचे. दोन किलो लोकरमध्ये एक घोंगडी किंवा रग तयार होऊन लोकरीचा दर्जा, जाडी व आकारानुसार दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत विक्री होई. (latest marathi news)

Wool
Dhule Water Scarcity : जिल्ह्यातील प्रकल्पांत अवघा 25 टक्के साठा; कडक उन्हामुळे जिवाची काहिली

मागणी शून्य

घोंगडी थंडी व पावसापासून शरीराचा बचाव करते. आदिवासी व पर्जन्यमान जास्त असणाऱ्या भागात घोंगडीला मागणी असे. परंतु छत्री, रेनकोट, स्वेटरच्या जमान्यात घोंगडीला कोण विचारतो? पांघरण्यासाठी रग व कांबळ वापरले जाते. ते तयार करण्याच्या क्षेत्रात अनेक कंपन्या उतरल्या.

दर्जात्मक स्पर्धेत येथील धनगर कारागीर जिंकले पण किमतीबाबत कंपनीशी स्पर्धा करणे शक्य झाले नाही. म्हणून मागणीत घट होऊन उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले. १९८० पूर्वी १२५ कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून होती. २००० मध्ये अवघे पाच व्यावसायिक उरले होते. आता तर एकही नाही. इतरांनी मिळेल ते काम स्वीकारले. व्यवसायातील परिवर्तन धनगर समाजाला खूप जड गेले.

लोकरीचे करावे तरी काय?

मेंढपाळांना दर सहा महिन्यात एकदा मेंढीचे लोकर काढणे भाग असते. एकेक मेंढपाळाकडे शेकडो मेंढ्या असल्याने मोठ्या प्रमाणात लोकर निघते. पण लोकरीला मागणीच नसल्याने काढलेली लोकर मिळेल तेथे फेकून दिली जाते. त्यामुळे ठेलारी मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे पण त्याला इलाज नाही.

शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष

धनगर कुटुंबांनी अद्यापही घोंगडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जपून ठेवले आहे. शासन व प्रशासनाने व्यवसायाला चालना देण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. या व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, प्रशिक्षण देणे, अत्याधुनिक यंत्रमागासाठी कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य करणे, पूरक व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे, लोकरीचा वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे.

Wool
Dhule Water Scarcity : जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ नियंत्रण कक्ष : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com