National Lok Adalat : 2 हजार ३४८ प्रकरणे तडजोडीअंती निकाली

National Lok Adalat : धुळे जिल्ह्यातील न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात २ हजार ३४८ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.
Present at the National Lok Adalat organized in the court, Judge K.T. Adike, Adv. Y. P. Kasari et al.
Present at the National Lok Adalat organized in the court, Judge K.T. Adike, Adv. Y. P. Kasari et al.esakal

Dhule News : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे अध्यक्ष माधुरी आनंद यांच्या आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव, धुळे तथा न्यायाधीश संदीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण धुळे जिल्ह्यातील न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात २ हजार ३४८ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.

तसेच तिन्ही न्यायालयातील एकूण ४३ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड निकाली करण्यात आली. (Dhule lok Adalat 2 thousand 348 case settled after compromise)

यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश कैलास अढायके यांनी न्यायालयांमधून जास्तीत जास्त प्रकरणे लोकन्यायालयात निकाली काढण्याच्या दृष्टीने संबंधित प्रकरणातील वकील वर्ग, पक्षकार, नगरपालिका, पंचायत समिती संबंधित अधिकारी, बॅंक, फायनान्स कंपनी अधिकारी यांना प्रकरणे तडजोडीसाठी ठेवून तडजोडीसाठी प्रयत्न करण्यासाठी आवाहन केले होते.

सदर लोकन्यायालयात प्रमुख पॅनल न्यायाधीश म्हणून के. टी. अढायके व पॅनल सदस्य म्हणून अॅड. एस. टी. कामडे यांनी काम पाहिले. यात दाखलपुर्व बॅंक प्रकरणे, फायनान्स कंपनीचे प्रकरणे, महावितरण कंपनी, एनआयअॅक्ट खालील प्रकरणे तसेच ग्रामपंचायतींची एकुन दोन हजार ३४८ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.

Present at the National Lok Adalat organized in the court, Judge K.T. Adike, Adv. Y. P. Kasari et al.
Dhule News : नुकसानग्रस्त शेतीचा आमदारांनी केला दौरा; पंचनाम्यांचे आदेश

तसेच तिन्ही न्यायालयातील एकूण ४३ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली असून त्यात फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, एन.आय.अॅक्ट प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे व दिवाणी प्रकरणात तडजोड करण्यात येवून निकाली काढण्यात आली.

सदर लोकअदालतीमध्ये तालुका वकील संघ अध्यक्ष ॲड. वाय. पी. कासार, सर्व विधीज्ञ यांनी सहभाग नोंदविला. तसेच बॅंक अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, नगरपालिका कर्मचारी, पोलिस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी सदर लोकअदालत यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Present at the National Lok Adalat organized in the court, Judge K.T. Adike, Adv. Y. P. Kasari et al.
Dhule News : खानदेशात भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरणार : बाळासाहेब थोरात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com