Dhule Lok Sabha Constituency : काँग्रेसच्या नाराज गटाकडून तिसऱ्या पर्यायाला सुरूंग!

Dhule News : माजी आमदार अनिल गोटे यांनी निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याचा खटाटोप सुरू केल्याने लोकसभेच्या धुळे मतदारसंघात रंगत वाढत चालली होती.
Shyam Saner speaking at a gathering of displeased Congress group at Bijasani Mangal office.
Shyam Saner speaking at a gathering of displeased Congress group at Bijasani Mangal office.esakal

Dhule News : काँग्रेसमधील नाराजांकडून बंडखोरीचे संकेत आणि भाजपविरोधात भूमिका घेणारे माजी आमदार अनिल गोटे यांनी निवडणुकीत तिसरा पर्याय देण्याचा खटाटोप सुरू केल्याने लोकसभेच्या धुळे मतदारसंघात रंगत वाढत चालली होती. या महानाट्यामुळे भाजपच्या गोटातही काहीशी चिंता होती. (Dhule Lok Sabha Constituency)

राजकीय पटलावर बुधवारपर्यंत कायम दिसणारे हे वातावरण गुरूवारी (ता. २५) अनपेक्षितपणे बदलले. राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी एकमत असल्याची भूमिका जाहीर करत काँग्रेसच्या नाराज गटाने नाट्यमय पद्धतीने पडदा टाकला. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या तिसऱ्या पर्यायाला सुरूंग लागला.

काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, नाशिकच्या जिल्हाध्यक्ष पदावर असताना डॉ. तुषार शेवाळे यांनी नाराजीतून राजीनामास्त्र उगारले होते. डॉ. शेवाळे यांचा राजीनामा मंजूर झाला, परंतु श्री. सनेर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षस्तरावरून कालपर्यंत सुरू होता.

तिसऱ्या पर्यायाची नांदी

एकिकडे या घडामोडी सुरू असताना भाजपचे विरोधक माजी आमदार गोटे यांनी संधीचे सोने करण्याचा प्रयत्न चालविला. त्यांनी उमेदवारीप्रश्‍नी काँग्रेसचा नाराज गट, भाजपमधील नाराज गटाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी लोकसभेच्या धुळे मतदारसंघात तिसरा पर्यायाची नांदी असल्याचे संकेत दिले.

त्याला पुष्टी देण्यासाठी दाभाडी (मालेगाव) येथे बैठकही झाली. त्या बैठकीत गोटे, सनेर, डॉ. विलास बच्छाव आदी उपस्थित होते. मात्र, शिरकाव करत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बैठक उधळून लावली. तिसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून सक्षम उमेदवार देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यावेळी सांगण्यात येत होते. अशा राजकीय रंगतदार घडामोडींमुळे भाजपमध्ये नाही म्हटले तरी काहीशी अस्वस्थता दिसत होती. (Latest Marathi News)

Shyam Saner speaking at a gathering of displeased Congress group at Bijasani Mangal office.
Dhule Lok Sabha Election 2024 : धुळे लोकसभा निवडणूक लढविणार नाही : रहेमानी

मतविभाजनाचा धोका

माजी आमदार गोटे यांच्या तिसऱ्या पर्यायाच्या भूमिकेमुळे मत विभाजनाचा धोका भाजपला जाणवू लागला. भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशा तिरंगी लढतीत तिसऱ्या पर्यायाचा हेका लावत नाराज इच्छुकांचे मत विभाजनाचे डावपेच दिसून येत होते. तिसऱ्या पर्यायाच्या माध्यमातून भाजपला नामोहरम करण्याचे प्रयत्न होतील, असे गोटे, सनेर सांगत होते.

अशात डॉ. शेवाळे यांनी अपक्ष उमेदवारीबाबत चाचपणी सुरू केली तरी त्यांची भूमिका तळ्यात- मळ्यात असल्याचे काँग्रेसच्याच गोटातून सांगण्यात येते. माजी आमदार गोटे तिसरा पर्याय देताना नेमका कुठला उमेदवार देणार हे गुलदस्त्यात राहिले. तसेच जिल्हाध्यक्ष सनेर हे पक्षासोबत राहतात, काँग्रेसकडूनच उमेदवारी अर्ज भरतात, अपक्ष उमेदवारी करतात की वंचित बहुजन आघाडीची वाट धरतात हे पाहणे उचित ठरेल, असे चित्र बुधवारी रात्रीपर्यंत कायम होते.

गुरूवारी नाट्यमय पडदा

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी श्री. सनेर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समर्थक कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली जाईल आणि मग निर्णय जाहीर करू, असे श्री. सनेर यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी शिंदखेडा येथे बिजासनी मंगल कार्यालयात गुरूवारीच (ता. २५) मेळावा घेतला. जास्त ताणले तर तुटेल या उक्तीची जाणीव झाल्याने सनेर समर्थक कार्यकर्त्यांनी पक्षाशी जुळवून घ्यावे.

Shyam Saner speaking at a gathering of displeased Congress group at Bijasani Mangal office.
Dhule Lok Sabha Constituency : खासदार निवडीत महिलांची भूमिका निर्णायक; साडेनऊ लाखांवर स्त्री मतदार
MLA Kunal Patil
MLA Kunal Patilesakal

उमेदवारीप्रश्‍नी अन्याय झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करावे, विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाने न्याय द्यावा, भाजपच्या विचारांना विरोधासाठी तीस वर्षे निष्ठेने पक्ष कार्य केले, मग या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात काँग्रेसमधील दुहीचा भाजपला लाभ होऊ नये यासाठी पक्षाचा प्रचार करावा, असा सल्ला श्री. सनेर यांना दिला.

त्यांनीही राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी एकमत असल्याचे सांगत पक्ष कार्याला जुंपून घेईल, असे जाहीर केले. त्यातून नाराजी नाट्यावर पडदा टाकण्यात आला. त्यामुळे नेत्यांना हायसे वाटत असावे. यात काँग्रेसमधील नाराज गटाच्या अशा भूमिकेमुळे तिसऱ्या पर्यायाच्या प्रयत्नांना सुरूंग लागल्याचे चित्र आहे.

कुणाल पाटील यांची उपस्थिती

शिंदखेडा येथील नाराज गटाच्या मेळाव्यात आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थिती दिली. त्यांनी सनेर हे पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते कसे आहेत हे काही उदाहरणांवरून सांगितले. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील एका निवडणुकीत गजानन पाटील यांच्याशी टक्कर देताना माजी मंत्री रोहिदास पाटील हे केवळ तीनशे मतांनी विजयी झाले होते. अशा निकालावेळी माजी मंत्री पाटील यांच्यासोबत शेवटपर्यंत केवळ सनेर थांबले होते, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत एकाच गाडीतून येऊ, आमदार पाटील यांनी सनेर यांच्याविषयी सूचक विधान केले.

Shyam Saner speaking at a gathering of displeased Congress group at Bijasani Mangal office.
Dhule Drought News : सोनगीर परिसरात मासेमारी ठप्प; धरणे, तलाव एप्रिलमध्येच कोरडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com