Dhule Lok Sabha Election 2024 : मोदी पंतप्रधान होण्यासाठी हॅट्‌ट्रिक करा : डॉ. सुभाष भामरे

Dhule News : डॉ. भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यात नगाव, देवभाने, कापडणे, धनूर, कौठळ, न्याहळोद, फागणे, अजंग, मुकटी आदी गावांमध्ये रॅली, सभा झाली.
While campaigning on the occasion of Lok Sabha elections, BJP candidate Dr. Subhash Bhamre and officials.
While campaigning on the occasion of Lok Sabha elections, BJP candidate Dr. Subhash Bhamre and officials.esakal

Dhule Lok Sabha Election 2024 : देशविघातक शक्तींना रोखणे, देश आर्थिक महासत्ताक होणे, देशाचा सर्वांगीण विकास साधणे यासाठी भाजपचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. त्यासाठी लोकसभेच्या धुळे मतदारसंघात अधिकाधिक मतदानातून भाजप-महायुतीच्या उमेदवाराला (डॉ. भामरे) हॅट्‌ट्रिकची संधी द्यावी, असे आवाहन भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. (Dhule Lok Sabha Election 2024 dr subhash bhamare)

डॉ. भामरे यांच्या प्रचारार्थ धुळे तालुक्यात नगाव, देवभाने, कापडणे, धनूर, कौठळ, न्याहळोद, फागणे, अजंग, मुकटी आदी गावांमध्ये रॅली, सभा झाली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, धुळे ग्रामीण विधानसभेचे समन्वयक राम भदाणे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे, किशोर सिंगवी, शंकरराव खलाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, रितेश परदेशी, किशोर हालोर, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, आशुतोष पाटील, धुळे जिल्हा बँकेचे संचालक अनिकेत पाटील, भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र निकम आदी उपस्थित होते.

मोदींमुळे देशाचा विकास

डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा चौफेर विकास होत आहे. प्रत्येक विकास घटकाची प्रगती कशी होईल यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसच्या कालावधीत अकराव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर केवळ पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आली आहे.

येत्या कालावधीत देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या विकासकार्याला रोखण्याचा देशविघातक शक्ती प्रयत्न करू शकते. ते प्रयत्न अधिकाधिक मतदानातून उधळून लावत मतदारांनी पंतप्रधानपदाची मोदी यांना, तर धुळे लोकसभा मतदारसंघात मला (डॉ. भामरे) हॅट्‌ट्रिक करण्याची संधी द्यावी. (Latest Marathi News)

While campaigning on the occasion of Lok Sabha elections, BJP candidate Dr. Subhash Bhamre and officials.
Nashik Lok Sabha Election : वयोवृद्ध, दिव्यांगांचे आजपासून मतदान; नाशिक मध्य विधानसभेत 1 हजार 264 वृद्ध, 212 दिव्यांग मतदार

स्वस्थ बसणार नाही

खासदार म्हणून दहा वर्षांत सिंचन, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पाणी यासह विविध क्षेत्रांतील विकासाला प्राधान्य दिले. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न प्राधान्याने हाताळत निराकरणासाठी शक्ती पणाला लावली. शेतकरी हितासाठी ३० ते ३५ वर्षे प्रलंबित सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावला.

विरोधकांची अनेक वर्षे सत्ता असूनही ते या योजनेला गती देऊ शकले नव्हते. याकामी पंतप्रधान मोदी यांनी अडीच हजार कोटींचा निधी देत धुळे व शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित पाहिले. चार वर्षांत या योजनेचे ८० काम झाले आहे. या योजनेद्वारे मुकटी परिसरासाठीही पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही डॉ. भामरे म्हणाले.

पुन्हा संधी मिळावी

अक्कलपाडा प्रकल्प पूर्ण करणे, दळणवळण बळकटीकरण, तसेच बागलाण, मालेगाव तालुक्यातील सिंचनाचे प्रकल्प असो यासंबंधी कामे मार्गी लावत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा पाया रचण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. विकासाचे अन्य प्रश्नही मार्गी लावण्यात यशस्वी झालो आहे. उर्वरित प्रकल्प, योजना व विकासकामे पूर्ण करण्यासाठी तिसऱ्यांदा संधी द्या, असे आवाहन उमेदवार डॉ. भामरे यांनी केले.

While campaigning on the occasion of Lok Sabha elections, BJP candidate Dr. Subhash Bhamre and officials.
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर, हातकणंगलेचा टक्का गतवेळेपेक्षा एकने वाढला; तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर राज्यात अव्वल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com