Dhule Lok Sabha Election : मतदार सुलभता केंद्राची स्थापना; कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान कक्षही सज्ज

Dhule News : मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा यासाठी मतदार सुलभता केंद्राची स्थापना झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
Election
Election esakal

Dhule News : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेच्या कर्तव्यावर असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा यासाठी मतदार सुलभता केंद्राची स्थापना झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. (Dhule Lok Sabha Election Establishment of Voter Facilitation Centre)

निवडणुकीत ०१-नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे, तर ०२-धुळे लोकसभा मतदारसंघासाठी २० मेस मतदान होणार आहे. या दिवशी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा यासाठी मतदार सुलभता केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ०५-साक्री आणि ०९-शिरपूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश नंदुरबार लोकसभा मतदारसंघात होतो, तर ०२-धुळे लोकसभा मतदारसंघांतर्गत धुळे जिल्ह्यातील ०६-धुळे ग्रामीण, ०७-धुळे शहर, ०८-शिंदखेडा या तीन तसेच नाशिक जिल्ह्यातील ११४-मालेगाव मध्य, ११५-मालेगाव बाह्य, ११६-बागलाण या तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

तीन दिवस सुविधा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा यासाठी १७ ते १९ मे या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत माहिती व जनसंपर्क भवन, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजल्यालगतची उजवीकडील खोली क्रमांक एक (माध्यम कक्ष), जिल्हाधिकारी कार्यालय आवार. (latest marathi news)

Election
Dhule News : ‘ऑपरेशन ऑल आउट’मध्ये गावठी कट्टे, तलवारी हस्तगत; 72 गुन्हेगारांची झाडाझडती

धुळे येथे मतदार सुलभता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निर्धारित तारखेला टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी निश्चित केलेल्या स्थळाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले.

टपाली मतदान कक्ष

मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क टपाली मतपत्रिकेद्वारे बजावता यावा यासाठी टपाली मतदान कक्ष (पोस्टल वोटिंग सेंटर) स्थापन करण्यात आला आहे. यात १४ ते १६ मे या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत माहिती व जनसंपर्क भवन.

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील तळमजल्यालगतची उजवीकडील खोली क्रमांक एक (माध्यम कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे टपाली मतदान कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी दिली.⃘

Election
Jalgaon News : राजकारणापलीकडे जाऊन ज्येष्ठांप्रति आदराचे दर्शन! विमानतळावर नेते-पदाधिकाऱ्यांची मांदियाळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com