Dhule Lok Sabha Election : देशात परिवर्तन आणणारी निवडणूक : मल्लिकार्जुन खर्गे

Lok Sabha Election : संविधान वाचले, तरच देश वाचेल, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी (ता. १२) शिंदखेडा येथे मांडली.
Mr. Kharge held a meeting in the premises of Kisan Vidyalaya.
Mr. Kharge held a meeting in the premises of Kisan Vidyalaya.esakal

Dhule Lok Sabha Election : लोकसभेची यंदाची निवडणूक देशात परिवर्तन आणणारी असून भाजपचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मते दिली तर पुढची पिढी गुलामगिरीत असेल, असे विधान करत संविधान वाचले, तरच देश वाचेल, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी (ता. १२) शिंदखेडा येथे मांडली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ श्री. खर्गे यांची किसान विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी तीननंतर सभा झाली. ( Mallikarjun Kharge statement of An election that will transform country )

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस सचिव आशिष दुआ, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी खासदार बापू चौरे, माजी मंत्री चंद्रकांत डंडोरे, अनिस अहमद, माजी आमदार अनिल गोटे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत श्री. खर्गे म्हणाले, की भाजप व आरएसएस ही निवडणूक लढवत असून संविधान बदलण्यासाठी, याकामी बहुमतासाठी चारशे पारचा नारा ते देत आहेत. पंतप्रधान मोदी प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होते. त्याचे काय झाले. काँग्रेसने २५ योजनांचा जाहीरनामा दिला आहे. त्यात महिलांना ८५०० रुपये दरमहा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (latest marathi news)

Mr. Kharge held a meeting in the premises of Kisan Vidyalaya.
Dhule Lok Sabha Election : मतदार सुलभता केंद्राची स्थापना; कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान कक्षही सज्ज

भाजपचे अब की बार चारशे पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाहीत. पंतप्रधान मोदींच्या तोंडी उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्राचीच भाषा दिसते. त्यांनी विकास कामांवर मते मागून दाखवावी.

मोदी सरकारकडून सरकारी यंत्रणेचा वारेमाप गैरवापर झाला असून कारवाईच्या भितीने अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाख शिंदेंनी लोंटागण घातले. काँग्रेस देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले. भारतीय जनता पक्षाने देशासाठी काय केले, असा प्रश्‍न श्री. खर्गे यांनी उपस्थित केला.

Mr. Kharge held a meeting in the premises of Kisan Vidyalaya.
Dhule Lok Sabha Election: मतदारसंघात रोजगारनिर्मितीला प्राधान्य : उमेदवार डॉ. भामरे; शिंदखेड्यात विकास कामांचा घेतला परामर्श

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com